भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यासाठी रावेर शहर सज्ज

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती रावेर शहरात अत्यंत उत्साहात व शिस्तबद्धपणे साजरी करण्यात येणार आहे.त्यासाठी रावेर शहरातील जयंती उत्सव समितीसह  पदाधिकार्‍यांनी नियोजन केले आहे. [ads id="ads1"]  

शुक्रवार, 14 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर रावेर शहरातून मिरवणुक निघणार असल्याची माहिती आहे. रावेर शहरातील चौका- चौकात महामानवाला अभिवादन करणारे बॅनरही झळकले आहेत. तर निळ्या ध्वजाला देखील नागरीकांकडून मागणी असल्याने दोन दिवसांपासून रावेर शहरातील विविध भागात विक्रेते दाखल झाले आहेत. [ads id="ads2"]  

रावेर शहरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलीस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त राखण्याचे नियोजन केले असून सोशल मिडीयावरही पोलिसांची करडी नजर आहे. 

रावेर शहरात सर्वत्र बॅनर्स, निळे झेंडे व निळ्या रंगात रोशनाई करण्यात आल्याने संपूर्ण रावेर शहर निळेमय झाले आहे. रात्री दुभाजकातील पोलवर लावण्यात आलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे बॅनर आकर्षण ठरत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

🙏🙏जाहीर आवाहन🙏🙏

सर्व समाज बांधव, भगिनी, मान्यवर, अधिकारी, राजकिय व सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक संस्थेचे पदाधिकारी,भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक व बौद्धाचार्य,पत्रकार बांधव आदींना नम्रपणे आवाहन   

करण्यात येते की भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमीत्त प्रतिमा पूजन व धार्मिक विधी करून अभिवादन कार्यक्रम दिनांक 14/4/2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी. हि विनंती .

*️⃣कार्यक्रमाची रूपरेषा*️⃣

  1) सकाळी 9 वाजता पूजन व धार्मिक विधी.

  2 ) सकाळी 9.30 वाजता मोटार सायकल अभिवादन रॅली.

  3 )सकाळी 10 वाजता अभिवादन सभा.

   4) सायंकाळी 5वाजता भव्य मिरवणूक.

तरी वरील सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे ही विनंती.

 ठिकाण:- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेर

आपले नम्र:-

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती,रावेर शहर 2023

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!