मध्यंतरीच्या काळात बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याने बदलीच्या प्रक्रिया झालेल्या नव्हत्या. आर्थिक वर्ष मार्च महिना संपताच उषाराणी देवगुणे यांची बदली करण्यात आली आहे. या बाबत राज्य शासनाचे सहसचिव डॉ.माधव विर यांच्या आदेशाने परिपत्रक जारी करण्यात आले आहेत. [ads id="ads2"]
या परिपत्रकात रावेर तालुक्याच्या (Raver Taluka) तत्कालीन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची बदली कोणत्या पदावर किंवा कुठे करण्यात आली. याबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.
तर त्यांच्या जागी नूतन तहसीलदार नाशिक जिल्ह्यातील कळवण (Kalvan,Nashik District) येथून बंडु कापसे यांची रावेर तहसीलदार पदि नियुक्ती करण्यात आली असल्याचे मूद करण्यात आले आहे. नूतन तहसीलदार बंडु कापसे हे लवकरच रावेर तहसीलदार म्हणुन सूत्र हातात घेणार आहेत.
हेही वाचा:- सातवी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी:(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 160 जागांसाठी भरती


