मंत्री मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा कार्यालयाला दिली सदिच्छा भेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी

जळगाव पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, तथा जळगाव व बुलढाणा जिल्हा पालकमंत्री, मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील साहेब, यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन जळगाव जिल्हा कार्यालय येथे आज दि. २ एप्रिल २०२३ रविवार रोजी सदिच्छा भेट देवून वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयकांना मार्गदर्शन केले.[ads id="ads1"]

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील रूग्णांना वैद्यकीय मदतीसाठी ई-मेल व हेल्पलाईन क्रमांक 9049490969 तसेच जळगाव जिल्ह्यात 'आरोग्याचा महायज्ञ' अर्थात संपुर्ण जिल्हाभरात मोफत आरोग्य शिबीरांना सुरूवात व एक्स-रे व महागड्या तपासण्या अल्पदरात या सर्व योजनांचे लोकार्पन आज रोजी शिवसेना नेते, पालकमंत्री मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांनी केले. [ads id="ads2"]

या प्रसंगी पालकमंत्री यांनी लवकरच जिल्ह्यासाठी फिरते आधुनिक डोळे तपासणी वाहन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली माहिती दिली. पुढील दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्ह्यातील रूग्णांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने जळगाव जिल्ह्या आतापर्यंत 400 च्या वर रुग्णांना तीन करोड रूपयांपर्यंत निधी मुख्यंमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध करून दिल्या बद्दल जिल्ह्यातील संपुर्ण वैद्यकीय मदत कक्ष टिमचे कौतुक केले. असेच कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

        या प्रसंगी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत गजेंद्र जाधव यांची सहाय्यक उपशहर समन्वयक या पदाची जबाबदारी देण्यात आली. असोदा येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन 9 एप्रिल 2023 रोजी आयोजित केलेले असून या शिबिराचा त्या परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

            या प्रसंगी वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे जिल्हा संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, जिल्हाप्रमुख डॉ. मोईज देशपांडे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सपकाळे, महानगरप्रमुख विशाल परदेशी, सोशल मिडीया जिल्हाप्रमुख भावेश ढाके, उपजिल्हाप्रमुख विशाल निकम, कार्यालय अधिक्षक दिपक पाटील, मदत कक्ष पदाधिकरी सागर सोनवणे, रोशन ठाकरे, अनिल पवार, सतिश सोनवणे, भुषण पाटिल, भाग्येश पाटील, धिरज राठोड, जिल्ह्यातील सर्व आरोग्यसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!