डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सर्वांनी पालन करावे : डि.वाय.एस.पी. डॉ.कुणाल सोनवणे
डॉ.कुणाल सोनवणे पुढे म्हणाले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या संविधानांवर संपूर्ण देश चालतो संविधानात तरतुदीनुसार देशात कायदे तयार होतात म्हणून संविधानाचे व कायद्याचे सर्वांनी पालन करावे हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल. जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कायदा हा सक्षम आहेत कायदा कोणालाही माफ करत नाही. म्हणून आगामी क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व रमजान ईद हे सण उत्सव साजरे करताना सामाजिक शांतता व जाती धार्मिक एकोपा कायम राखा प्रत्येक धर्मियांनी एकमेकांचा सण उत्सवात सहभागी होऊन धार्मिक सहिष्णुता द्विगुणीत करा असे आवाहन उप.विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी रावेर पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.[ads id="ads1"]
क्रांतीसुर्य महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव रमजान ईद या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस सहाय्यक निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर भाऊ महाजन, अँड. योगेश गजरे, डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष पिंटूभाऊ वाघ, कामगार नेते दिलीप कांबळे, शिवसेना नेते अशोक शिंदे, शेख गयाभाई, माजी नगराध्यक्ष हरिषशेठ गणवानी, बसपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
यावेळी कार्यक्रमाला डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष पिंटू भाऊ वाघ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष महमूद शेख वंचित वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बाळू बाळू शिरतुरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष पंकजभाऊ वाघ, भाजपा प्रसिद्धीप्रमुख नितीन पाटील, सादिक मेंबर,शेख युसुफ, संघरत्न दामोदर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,मुस्लिम पंच कमिटी ,हिंदू पंच कमिटी, व तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वीसाठी फौजदार राजेंद्र करोडपती, पुरुषोत्तम पाटील , व पोलिसांनी सहकार्य केले.

