भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रावेर विधानसभा मतदार संघाचे आ. शिरीष चौधरी, रावेर चे तहसीलदार बंडू कापसे, रावेर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक शितलकुमार नाईक, रावेर शहर जयंती उत्सव समिती अध्यक्ष पिंटू वाघ यांच्या सह संपूर्ण कार्यकारिणी, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, हरिषशेठ गणवानी, दारा मोहंमद , बाळू शिरतूरे, डी.डी.वाणी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपपूजा व धूपपूजा करण्यात आले. [ads id="ads2"]
यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे व बौद्धाचार्य विजय अवसरमल यांनी उपस्थित समाज बांधवांना त्रिशरण पंचशील दिले. यावेळी तहसीलदार बंडू कापसे, डॉ. कुंदन फेगडे, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, कामगार नेते दिलीप कांबळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रावेर शहरातून भव्य अशी मोटार सायकल अभिवादन रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमास जि. प. माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे,प्रा.सी. एस. पाटील, अशोक शिंदे, अरुण शिंदे, जगदीश घेटे, रंजना गजरे, दिपक नगरे, पंकज वाघ, संगीता घेटे, डॉ. सुरेश पाटील, सुरेश धनके, राजू सवर्णे, राजन लासुरकर, किशोर पाटील, सोपान पाटील, प्रकाश महाले, उमेश गाढे, नगीन इंगळे सर, महेश तायडे, अॅड. सुभाष धुंदले, बाळू तायडे, अमर तायडे, सावन मेढे, संघरक्षक तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी उत्सव समिती अध्यक्ष पिंटू वाघ, उपाध्यक्ष गोपाल बाहें, सचिव सुनिल शिरतुरे, कोषाध्यक्ष संकीत तायडे, गोपाल तायडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक अॅड. योगेश गजरे यांनी केले.