भारतीय बौद्ध महासभा रावेर शहर शाखेची कार्यकारिणी जाहीर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर शहर अध्यक्षपदी राहुल डी गाढे,

सरचिटणीस विशाल तायडे, 

कोषाध्यक्ष पदी यशवंतराव कोंघे,

तर कार्यालयीन सचिवपदी धनराज घेटे यांची निवड

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  - रावेर येथील सावदा रोड स्थित तक्षशिला बौध्द विहार येथे दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नाशिक विभागीय सचिव के. वाय.सुरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभा रावेर शहर शाखेची निवड करण्यात आली.[ads id="ads1"] 

सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक रित्या त्रिशरण, पंचशिल घेण्यात आले.

यात भारतीय बौद्ध महासभा रावेर शहर अध्यक्षपदी राहुल डी.गाढे,सरचिटणीस विशाल तायडे, कोषाध्यक्ष पदी यशवंतराव कोंघे,तर कार्यालयीन सचिव पदी धनराज घेटे यांची बिनविरोध निवड सर्वानुमते एकमताने करण्यात आली.[ads id="ads2"] 

 सदर निवड प्रक्रिया भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव, नाशिक विभागीय सचिव के. वाय.सुरवाडे, हिशोब तपासनीस ए. टी. सुरळकर, समता सैनिक दलाच्या मेजर युवराज नरवाडे,केंद्रीय शिक्षिका लताताई तायडे,केंद्रीय शिक्षिका प्रियंका ताई अहिरे, जिल्हा संघटक,विजय अवसरमल, एस.पी. जव्हरे, त्याच प्रमाणे रावेर शहरातील प्रतिष्ठित वामन तायडे,माजी नगरसेवक जगदीश घेटे, माजी नगरसेवक ॲड. योगेश गजरे,माजी नगरसेविका रंजना गजरे, वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे,युवा सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे, कामगार नेते दिलीप कांबळे, युवा सामाजिक कार्यकर्ते पंकज वाघ,उद्योजक दिलीप साबळे, सामूहिक विवाह अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,समता सैनिक दलाचे बाळू रजाने, कार्यालयीन सचिव सदाशिव निकम, बौद्धाचार्य गौतम अटकाळे, बौद्धाचार्य महेंद्र तायडे,राजेश गजरे,आशुतोष घेटे,यांच्यासह मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये

      सदर कार्यक्रमाची प्रस्तावना संघरत्न दामोदरे यांनी तर सूत्रसंचालन विजय अवसरमल आणि आभार राजेंद्र अटकाळे यांनी केले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!