रावेर वनविभागाच्या वतीने रावेर तालुक्यात 22 ठिकाणी वन्यप्राण्यांकरता कृत्रिम पाणवठे तयार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. कित्येक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असताना पशु पक्षांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यात 22 ठिकाणी वनविभागाच्या वतीने जंगलात पाणवठे तयार करण्यात आले असल्याचे रावेर वनविभाग अधिकारी अजय बावणे यानी सागितले आहेत. हे पाणवठे ऐन उन्हाळ्यात पशु पक्षांसाठी वरदान ठरत आहेत.[ads id="ads1"] 

रावेर तालुक्यात वन्य पशु पक्षांची संख्या देखील मोठी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कित्येक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक पाणवठे आटतात. अशावेळी पशु पक्षांना पाणी उपलब्ध करण्यासाठी रावेर तालुक्यातील वनविभागात बिट पाल, गारखेड, निमड्या, लोहारा, गारबर्डी, जिन्सी पाडल्या, जुनोने, लालमती, सहस्त्रलिंग येथे उपवनसंरक्षक यावल राजमीर शेख तसेच सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाइपे यावल यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर येथील अजय बावणे 22 ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरविले जात असल्याने वन्य पशु पक्षांना पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.[ads id="ads2"] 

पशुपक्षांना धान्य व पाण्याची सोय

रावेर तालुक्यात पूर्वीचे काही पाणवठे असून वनविभागाच्या वतीने नव्याने पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी रावेर अधिकारी, वनरक्षक यांसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष लक्ष ठेवून असतात. इतकेच नव्हे तर तालुक्यातील अनेक ठिकाणी पक्षी मित्रांकडून पक्षांना धान्य व पाण्याची सोय केली जात आहे. रावेर वनविभाग व पक्षी मित्रांच्या कार्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पशुपक्षांना धान्य, पाणी उपलब्ध होत आहेत.

वन्य पशु पक्षी आपली संपत्ती असून वन्य पशु पक्षांच्या संवर्धनासाठी वनविभाग नेहमी पुढाकार घेत आहे, मात्र नागरिकांनी देखील वन्य पशु पक्षांच्या अन्न पाण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

संकेत पाटील(खिर्डी ता.रावेर) पक्षी मित्र, सदस्य चातक निसर्ग संवर्धन संस्था.

रावेर तालुक्यातील ज्या ठिकाणी वन्य पशु, पक्षी आढळून येतात तेथे आम्ही पाणवठे तयार करत पाणी उपलब्ध करण्यात येत आहे, मात्र पाणवठ्यावर वन्य प्राणी आल्यास त्यांना नागरिकांनी त्रास देऊ नये.

अजय बावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!