दीपनगर ता.भुसावळ (सुमित निकम)एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळा सह इतर खाजगी प्राथमिक शाळेची दयानीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे शाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नसल्याने अशा वाईट स्थितीच परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण धडे घ्यावे लागत आहे.[ads id="ads1"]
दिपनगर येथील श्री शारदा प्राथमिक विद्यामंदिर दीपनगर (चिंचेची शाळा) या शाळेत परिसरातील हात मजुरी व गरीब कुटुंबातील मुल मुली शिक्षण घेत असेल बालवाडी १ ली ते ४ थी पर्यंत वर्ग भरत असतात त्या मानाने शाळेत सुविधांचा फार अभाव आहे शाळेच्या परिसराला पक्के वॉल कंपाऊंड नसल्यामुळे दिपनगर परिसरातील मोकाटसोडलेले डुक्कर या शाळेच्या पटांगणात मोठ्या प्रमाणात वावर करत आहे विद्यार्थी ज्या पिण्याच्या टाकीतून पाणी पितात त्याच टाकीच्या नळाला हे डुकरे तोंड लावतात शाळेच्या शौचालयाची दुर्दशा झाली असून अजिबात शौचालयाची स्वच्छता केली जात नसल्यामुळे सतत येथून दुर्गंधी येत असते डेंगू मलेरिया यासारख्या डासांची उत्पत्ती होऊन व मोकाट डुकरांमुळे स्वाइन फ्लू सारखे आजार निर्माण होण्याचा धोका आहे पटांगणाला पक्के वॉल कंपाऊंड नसल्यामुळे रात्रीच्या वेळी येथे मध्य प्रेमींचे अड्डे झाल्याचे वसाहतीतील नागरिकांमधून बोलले जात आहे.[ads id="ads2"]
शाळा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
दिपनगर सारख्या प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये अनोळखी नागरिकांना चौकशी केल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही परंतु एक दोन नव्हे तर मोठ्या प्रमाणात डुकरांच्या कळपाला येथे आदिवासी कसा मिळत आहे? या डुकरांना पकडण्यासाठी शासनाचा लाख रुपयाचा ठेका घेऊन सुद्धा हे डुकरे दीपनगर परिसरातील शाळा महाविद्यालयासह वसाहती मोठा उच्छाद करतात त्यात पिसाळेलेले डुक्कर असून त्यांनी एखाद्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचा चावा घेतल्यास याला जबाबदार कोण राहणार? डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथे डुकरांची शाळा भरते की काय? असा प्रश्न निर्माण होतो
एवढा मोठा डुकरांचा कळपा असल्यामुळे हे पाळीव आहे त का? याचा मालक कोण? याची चौकशी करून त्यांना शाळेच्या व महाविद्यालयासह दिपनगर वसाहतीतून दूर करण्याकडे मुख्याध्यापकांसह शाळा प्रशासनाचे सात दुर्लक्ष होत आहे