यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप - काँग्रेसकड़े प्रबळ उमेदवार : राष्ट्रवादीची फळी कमकुवत तर सेनेतील मतभेद मंत्री आमदार यांना डोकेदुखी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी एकूण 141 उमेदवारी अर्ज दाखल आहेत.नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची तारीख गुरुवार 20 एप्रिल 2023 असली तरी दाखल उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र लक्षात घेतले असता तसेच माघारी नंतर सुद्धा यावल कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार असल्याचे दिसून येत आहे, [ads id="ads1"] 

  तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचे दाखल नामनिर्देशन पत्र लक्षात घेतले असता दोन-तीन नामनिर्देशन पत्र वगळता त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार दिसून येत नाहीत त्यामुळे त्यांची फळी कमकुवत दिसून येत आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि शिंदे शिवसेना गटातील उमेदवारांचे आपापसातील मतभेद लक्षात घेतले असता जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील आणि चोपडा यावल विधानसभा क्षेत्र माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि विद्यमान आमदार सौ.  लताताई सोनवणे यांना काही प्रमाणात राजकीय डोकेदुखी राहणार असल्याचे यावल  तालुक्यात पूर्व पश्चिम कार्यक्षेत्रात बोलले जात आहे.[ads id="ads2"] 

         18 जागांसाठी उमेदवारी अर्जांची संख्या 141 आहे. त्यात सोसायटी मतदार संघाच्या 11 जागा ग्रामपंचायत मतदार संघाच्या 4  जागा व्यापारी मतदारसंघाच्या 2 जागा हमाल मापारी मतदारसंघातून  1 जागा असे एकूण 18 संचालक निवडून येणार आहेत.

         मागील 5 वर्षाच्या कालावधीत यावल कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची यादी बघितली असता भाजप आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रबळ असे उमेदवार होते.यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सुद्धा संचालक अधिकृतरित्या प्रबळ असा नव्हता.तर शिवसेनेचे दोन संचालक होते.

       यावल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस गटात सर्व स्तरातून प्रबळ असे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नेते व काही ठराविक जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष हिताच्या दृष्टिकोनातून तसेच कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करण्यासाठी ठोस निर्णय काय घेतले ? आणि का घेतले गेले नाही ? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

       त्याचप्रमाणे बाजार समिती निवडणुक रिंगणात शिंदे शिवसेना गटातील तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील आहेत, त्यांच्या 10 वर्षातील राजकीय हालचाली,समन्वय लक्षात घेता उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक आणि त्यांच्यात आता राजकीय मतभेद निर्माण झाले आहे. 

       सहकारी संस्था वि.जा. भ.ज.( एन.टी.) मतदार संघात एका जागेसाठी निवडणूक रिंगणात शिंदे गटाचे तुषार उर्फ मुन्ना पाटील यांचे तसेच भारतीय जनता पार्टी तर्फे उज्जैनसिंग राजपूत निवडणूक रिंगणात असल्याने तसेच राज्यात भाजप आणि शिंदे शिवसेना गटाची युती असल्याने तुषार उर्फ मुन्ना पाटील आणि उज्जैनसिंग राजपूत यांच्याबाबत जिल्हास्तरीय पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात..? याकडे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे लक्ष वेधून असले तरी उज्जैन सिंग राजपूत यांनी मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्यानुसार माघार घेतली होती आणि आहे त्याबाबत त्यांना आता राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे असे असताना तुषार उर्फ मुन्ना पाटील यांचे नावावर शिक्कामोर्तब झाल्यास यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रचारादरम्यान राजकीय दृष्ट्या अत्यंत चुरशीचे वातावरण निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!