सरस्वती इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


विवरे ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सरस्वती शैक्षणिक सांस्कृतिक विकास मंडळ विवरे संचलित, सरस्वती इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]  

           आजच्या   कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन श्री महेंद्र दयाराम पाटील ,सचिव सौ. संगीता महेंद्र पाटील ,मुख्याध्यापक श्री कुंदन महाजन ,पर्यवेक्षक श्री मिलिंद दोडके ,शिक्षकवृंद , उपस्थित होते.

                कार्यक्रमाप्रारंभी शाळेचे चेअरमन ,सचिव ,मुख्याध्यापक यांनी राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.[ads id="ads2"]  

                 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी भारतसह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष करणारे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समानता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा ‘समानता दिवस‘ आणि ‘ज्ञान दिन‘ म्हणून देखील साजरा केला जातो.डॉ.बाबासाहेब हे मानवी हक्क चळवळ, राज्यघटनेची निर्मिती, शोषितांचे थोर उद्धारक आणि त्यांच्या विद्वतेसाठी जगभरात ओळखले जातात. त्यांचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे जन्मस्थान जन्मभूमी (महू), बौद्ध धम्म दीक्षास्थळ दीक्षाभूमी (नागपूर), त्यांचे समाधी स्थळ चैत्यभूमी (मुंबई) आणि इतर अनेक स्थानिक ठिकाणी त्यांचे कोट्यवधी अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.

      शाळेतील इयत्ता पहिली ते नववी च्या विद्यार्थी/विद्यार्थ्यांनीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली. शिक्षक डिगंबर चौधरी, नितीन सराफ यांनीही आपले विचार व्यक्त केले.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!