रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिल कक्षात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
यावेळी रावेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रविण यादव यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.[ads id="ads2"]
कार्यक्रमास वकिल संघाचे अध्यक्ष ऍड. शीतल जोशी, उपाध्यक्ष ऍड. बी. डी. निळे, जेष्ठ वकील ऍड. व्ही. पी. महाजन, ऍड. योगेश गजरे, ऍड. सुभाष धुंदले, ऍड. प्रमोद विचवे,ऍड. धनराज ई. पाटील, ऍड. उदय सोनार, ऍड. रमाकांत महाजन, ऍड. दिपक तायडे यांच्या सह आदी वकिल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. शीतल जोशी यांनी केले.


