शिक्षण क्षेत्रात अनेक बोगस डिग्र्या बहादर कार्यरत...?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- जळगाव जिल्ह्यात असलेल्या भुसावळ,यावल येथे आणि रावेर तालुक्यातील सावदा व परिसरात बोगस डिगऱ्या व प्रमाणपत्र प्राप्त करून उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये काही महाभाग कार्यरत असून,याच धरतीवर आणखीन काहींनी भविष्यात उर्दू माध्यमांच्या काही सरकारी व संस्थेद्वारे संचालीत खाजगी शाळांमध्ये कार्यरत होण्याच्या उद्देशाने आपापल्या सोयानुसार लाभ उचलण्याकरिता सदर प्रकारे डिगऱ्या व प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्याची खात्रीलायक माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एकाने दिली.[ads id="ads1"]  

  तरी अशा बोगस डिगऱ्या व प्रमाणपत्र मिळवून देण्याचा गोरखधंद्याचा मुख्य सूत्रधार व मास्टरमाईंड भुसावळ येथील रहिवासी व पेशाने शिक्षक असलेला इक्बाल नामक व्यक्ती आणि सिल्लोड जिल्हा संभाजीनगर(औरंगाबाद)येथील एका व्यक्ती संगनमताने करित असल्याची चार्चा शिक्षण क्षेत्रात चर्चिला जात आहे.(शॉटकट)पणे बोगस का होईना मात्र डिगऱ्या व बनावट प्रमाणपत्र प्राप्ती साठी काही गरजू या गैरमार्गाने सदरील मुख्य सूत्रधाराना मोठी रक्कम देऊन आपले हित साधून घेत आशा डिग्य्रा व प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी सह वेतन मिळवून शासनाची फसवणूक करून स्वत:चे हित साधून घेत असल्याचेही बोलले जाते.[ads id="ads2"]  

सबब यात खरे काय खोटे काय हे समोर येणे आवश्यक असून शासनाच्या  यंत्रणेतील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे संवेदनशीलपणे जातीने लक्ष घालून सखोलपणे चौकशी करण्यासाठी विशेष फिरते पथकांची नेमून करावी.अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

"तसेच ज्या महाभागांनी अशा प्रकारे डिग्ऱ्या व प्रमाणपत्र मिळवले त्यांचे पत्ते व नावांची यादी लवकरच हाती लागणार?"यानंतर सदरचा प्रकार उघडकीस होतील.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!