यावल तहसीलच्या पुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सलीम पिंजारी  (फैजपुर ता.यावल प्रतिनिधी)

 येथील गेल्या चार महिन्यापासून यावल तहसीलच्या पुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार सुरू असून कोणतेही नियोजन नसल्यामुळे सिद्धा पत्रिका धारकांच्या वेगवेगळ्या कामासाठी नागरिकांना गेल्या चार महिन्यापासून यावल सह फैजपूर आमोदा बामनोद पाडळसा हंबर्डे हिंगणा पिम्प्रुड विरोधा म्हैसवाडी अठरावल सांगवी चितोडा या गावांच्या  नागरिकांची पायपीट होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी ला सामोरे जावे लागत आहे.[ads id="ads1"]  

  यावल तहसीलच्या पुरवठा विभागाकडून गेल्या चार महिन्यापासून सिद्धा पत्रिकेच्या वेगवेगळ्या कामासाठी नागरिकांचे कोणतेही काम होत नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे नागरिकांना शासकीय कामासाठी पायपीट करावी लागत आहे नवीन सिद्धा पत्रिका तसेच विभक्त जीर्ण झालेल्या सिद्ध पत्रिका अशा अनेक कामासाठी नागरिकांना यावल जावे लागते.[ads id="ads2"]  

  परंतु या परिसरातील नागरिकांचे या पुरवठा विभागात नियोजन शून्य कारभार होत असल्यामुळे नागरिकांना केवळ उद्या या परवा या सोमवारी या अशी उडवा उडवीचे उत्तर दिले जातात त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून स्वतः तहसीलदार महेश पवार यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे  आणि सिद्ध पत्रिका धारकांच्या होणाऱ्या अडचणी दूर कराव्या अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :- शेअर मार्केटच्या नावाखाली रावेर तालुक्यातील उदळी येथील शेतकरी तरुणाला साडे नऊ लाखांचा गंडा

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!