यावल ग्रामीण रूग्णालयात २५ एप्रिल जागतीक हिवताप निर्मूलन दिवस साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)

 हिवतापाविरुद्धच्या आपल्या सामूहिक लढाईत आणि वर्ष 2030 पर्यंत देशाला संपूर्णपणे हिवतापमुक्त करण्याचे आपले ध्येय साध्य करण्यात केवळ निदान आणि उपचारच नव्हे तर स्वतःची आणि आपल्या परिसरातील स्वच्छता तसेच हिवताप नियंत्रण आणि प्रतिबंध याबाबतची सामाजिक जागरुकता तेवढीच महत्त्वाची आहे” असे प्रतिपादन,   यावल ग्रामीण रूग्णालयात “जागतिक हिवताप दिन  निमित्त आयोजित कार्यक्रमात,  जील्हा आरोग्य अधिकारी डॉ लांडे यांनी“आरोग्य सुविधा वितरण प्रणालीचे प्रागतिक सशक्तीकरण आणि बहुक्षेत्रीय समन्वय आणि सहकार्य सुधारणे यावर भर देण्याची गरज आहे,”  असेही ते म्हणाले.[ads id="ads1"] 

दर वर्षी 25 एप्रिल हा दिवस  “जागतिक हिवताप दिन 2022” म्हणून साजरा करण्यात येतो. “जागतिक पातळीवर असलेला हिवताप रोगासंदर्भातील दबाव कमी करून जीव वाचविण्यासाठी अभिनव संशोधनाचा वापर करणे” ही या वर्षीच्या हिवताप दिनाची संकल्पना आहे. [ads id="ads2"] 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ लांढे  राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय प्रयत्नांच्या माध्यमातून हिवताप निर्मूलन करण्याला प्राधान्य दिले जावे असे आवाहन केले. भारताच्या हिवताप निर्मूलन योजनेला पुढे नेण्यासाठी आणि सुधारित आरोग्य आणि जीवनाचा दर्जा तसेच गरिबी कमी करण्यात योगदान देण्यात तंत्रज्ञान आणि अभिनव संशोधन यांची मदत घेणे उपयुक्त ठरेल यावर त्यांनी भर दिला. या रोगाचे निदान, वेळेवर आणि परिणामकारक उपचार तसेच रोगनियंत्रण उपाययोजना यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी आशा, एएनएम यांच्यासह अत्यंत मूलभूत पातळीवर काम करणारे आघाडीचे आरोग्यसुविधा कर्मचारी तसेच भागीदार संघटना यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे ते पुढे म्हणाले. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसह खासगी क्षेत्राने त्यांच्या हिवताप रुग्ण व्यवस्थापन, अहवाल आणि संबंधित उपक्रम हिवताप संबंधी कार्यक्रमाशी समन्वय साधण्याची गरज आहे अशी सूचना त्यांनी पुढे केली.

या कार्यक्रमा दरम्यान जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ लांडे तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज चौधरी, विस्तार अधिकारी श्री डी सी पाटिल, वैद्यकिय अधिक्षक डॉ चव्हाण, डॉ देशमुख,  प्रयोग शाळा वैज्यनिक  नानासाहेब घोडके, आरोग्य पर्यवेक्षक नेमाडे, आरोग्य सेवक आर एस तडवी, यांच्यासह बहूसंख्य स्टॉप उपस्थित राहून  उपस्थित जनतेला हिवताप निर्मूलन विधेयक जनजागृती करून  कार्यक्रम राबविण्यात आला,

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!