डीलरशिप देण्याच्या नावाखाली रावेर तालुक्यातील व्यावसायिकाची तब्बल पाच लाख ५० हजारांची ऑनलाइन फसवणूक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


बऱ्हाणपूर साठी(Burhanpur,Madhya Pradesh)  मोटारर्सची डीलरशिप देण्याच्या नावाखाली रावेर तालुक्यातील (Raver Taluka)  एका व्यावसायिकाची तब्बल पाच लाख ५० हजारांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [ads id="ads1"] 

सायबर पोलिस ठाण्यात (Cyber Police Station)दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विजय एकनाथ पाटील वय - ५९, रा. मोरगाव खुर्द, ता. रावेर(Morgaon Taluka Raver)कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. खासगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या महिन्यात त्यांना अशोक पांडे आणि धरणीधर पाटील नावाच्या दोन व्यक्तींचा फोन आला.[ads id="ads2"] 

किया मोटारर्सची बऱ्हाणपूर (Burhanpur,Madhya Pradesh)  येथे डीलरशिप देण्याची ऑफर देत (आमिष) दोघांनी त्यांचा विश्वास संपादन केला. कार शोरूमसाठी वेळोवेळी आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल पाच लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले.

हेही वाचा:- आमदार चंद्रकांत पाटील यांचे आमदार एकनाथ खडसेंना थेट आव्हान, म्हणाले......

हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी 

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये

हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

पैसे देऊनही डीलरशिप (Dealership) देण्यास टाळाटाळ होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय पाटील यांनी सोमवारी (ता. २४) सायंकाळी सहाला जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अशोक पांडे आणि धरणीधर पाटील असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर पुढील तपास करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!