भुसावळ येथील यावल रोडवरील पोदार शाळेत विद्यार्थी परिषदेची स्थापना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
भुसावळ येथील यावल रोडवरील पोदार शाळेत विद्यार्थी परिषदेची स्थापना


यावल (सुरेश पाटील)

पोदार शाळेत विद्यार्थी परिषदेची समिती स्थापित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक संस्कारयुक्त लीडर शिपची क्वॉलीटी निर्माण करण्यासाठी विदयार्थी परिषद समिती दरवर्षी स्थापन करण्यात येते. समितीतील सदस्यांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येते.मुलाखती वेगवेगळ्या पोदार शाळेच्या शाखेतील प्राचार्य घेतात. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली.  [ads id="ads1"] 

                कार्यक्रमात सुरवातीला शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ व मोमेंटोज देऊन स्वागत केले. शाळेच्या मंचावर विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांना श्याशे आणि बॅज  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कर्नल पवन कुमार (एन.सी.सी.चे एडमीन ऑफीसर),व लेफ्टनंट कॅप्टन राजेंद्र राजपूत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. समितीत विविध पदांवर विद्यार्थांची नियुक्ती करण्यात आली.यानंतर समितीतील सर्व विद्यार्थांनी शपथ घेतली.[ads id="ads2"] 

  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  कर्नल पवन कुमार यांनी एकात्मता,शिस्त व चालू घडामोडीवर आधारित सामान्य ज्ञान विद्यार्थांमध्ये असणे गरजेचे आहे असे संबोधिले.शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी समितीत निवड झालेल्या विद्यार्थांनचे अभिनंदन करून त्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शालेय स्तरावर विविध कार्य करण्यासाठी सुभेच्छा दिल्या. विद्यार्थी समितीच्या प्रतिनिधींनी संचलन केले.  आरना अग्रवाल,हर्जास छाब्रा,कांचन अहिरराव, अश्विन अक्काराजू,गायत्री लोखंडे,पियुषा चौधरी, हार्दिक राय,आर्या देशमुख, यश पाटील,विहान वाघुळदे, तनिष्का वर्मा,पार्थ पाटील, धारा चोरडिया,सार्थक रीतपुरे,शर्वरी अम्बुस्कर, रोहिणी बोरसे,नैतिक अग्रवाल,ओम चौधरी,टीया पाटील,अभिजिता कुमारी, जान्हवी महाजन,अवनी कोल्हे,अनन्य सिंग,अथांग जोशी,आर्यन जोशी,कौस्तुभ राझोदकर,सानिका चौधरी, गुरनीत कौरबल,अन्शिका पाचपोळे या विद्यार्थांनी शाळेतील समितीच्या विविध विभागांवर पदभार सांभाळला. 

हेही वाचा:- आमदार चंद्रकांत पाटील यांचे आमदार एकनाथ खडसेंना थेट आव्हान, म्हणाले......

हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी 

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये

हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

  या कार्यक्रमाच्या प्रसंगी सायन्स ओल्म्पियाड मध्ये उत्तीर्ण विद्यार्थांचे व शालेय स्तरावर संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट विज्ञानावरील मॉडलसाठी निवड झालेल्या विद्यार्थांना मेडल व प्रमाणपत्र प्रमुख उपस्थित अतिथींच्या हस्ते देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गातील  विद्यार्थांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे व्यवस्थापक रामदास कुळकर्णी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात भुसावळ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी नमूद केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!