भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जागतिक हिवताप दिनानिमित्त उपकेंद्र टहाकळी येथे दिनांक 25 04/2023 रोजी महाशय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाने हिवताप दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी हिवताप होऊ नये या संदर्भात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देण्यात आली. [ads id="ads1"]
आपल्या घराच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थाना मध्ये गप्पी मासे सोडावे घराच्या आजूबाजूला असलेल्या नारळाच्या करवंड्या रिकाम्या बाटल्या टायर यात पाणी साचू देऊ नये फ्रीज, कुलर,फुलदाणी नेहमी स्वच्छ करावी तसेच घरातील साठवून ठेवणाऱ्या टाक्या नेहमी पुसून स्वच्छ कराव्या आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा जेणेकरून डास मादी तेथे अंडी घालणार नाही सेफ्टी पाईपला जाळी बसवावी रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा डास प्रतिबंधात्मक क्रीमचा वापर करावा घराची दारे व खिडक्या डासरोधक जाळी बसवावी असे उपाय सांगण्यात आले.[ads id="ads2"]
कोणताही ताप असू शकतो असे समजून त्याकडे दुर्लक्ष न करता जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन रक्त नमुना तपासणी करून घ्यावा जेणेकरून वेळीच उपचार करून हिवताप टाळता येतो समुदाय अधिकारी डॉक्टर कमलेश तमखाने , श्री राजेंद्र भालेराव, आशा वर्कर, सरला कोळी, रेखा सुतार , प्रतिभा तायडे , अर्चना अंबुसकर, ग्रामस्थ उपस्थित होते.


