शेतात जात केली आत्महत्या
शेती काम करणाऱ्या राहुल याने गुरुवारी सायंकाळी नारायण राणे यांच्या शेतामध्ये जाऊन चिकूच्या झाडाला गळफास घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी सहा वाजता शेतमजूर शेतात कामाला गेल्यानंतर गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. [ads id="ads2"]
ग्रामस्थांनी राहुल सोनवणेचा मृतदेह खाली उतरून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (Jalgaon Civil Hospital Jalgaon) येथे रवाना केला. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी त्यास मयत घोषित केले.
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात (Jalgaon Taluka Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत राहुल सोनवणे यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परीवार आहे.