नाभिक समाजाच्या स्तुत्य कार्यक्रम
यावल सोमवार दि.17 एप्रिल 2023 रोजी भुसावळ शहर नाभिक संघाकडून भुसावळ शहरात संत शिरोमणी संत सेना महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
नाभिक संघ भुसावळ शहर भुसावळ कार्यकारणीच्या वतीने यंदा संत शिरोमणी संत सेना महाराज जयंती उत्साह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास उपस्थित संपूर्ण समाज बांधव बंधू भगिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते कार्यक्रमांत मा.आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते दातृत्व सन्मान सोहळा करण्यात आला.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित गणपत बोरणारे गुरुजी यांनी देखील समाजास पन्नास हजार रुपयाची देणगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी देण्यात आली. [ads id="ads2"]
याप्रसंगी आमदार संजय सावकारे साहेबांच्या हस्ते पंडित गणपत बोरणारे गुरुजीच्या संपूर्ण परिवाराचा व दिनकर नामदेव महाले,प्रकाश विष्णू वैद्य परिवाराचा व अन्य परिवारांचा दातृत्व स्वीकारल्या बद्दल सत्कार करण्यात आला.तसेच संजय भाऊ सावकारे,रजनीताई
सावकारे,सरपंच किन्ही निलमताई सोनवणे,चित्रा सोनवणे,योगेश अहिरे, अनिल टोंगे,माजी उपसरपंच सचिन सोनवणे (बंटीभाऊ) यांची उपस्थिती होती. नाभिक संघ आमदार संजयजी सावकारे यांनी भुसावळ शहर नाभिक समाज गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कारासाठी त्यांच्या आईच्या नावाने आजीवन एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
याप्रसंगी संपूर्ण समाजाने त्यांचे टाळ्यांच्या कडकडात अभिनंदन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे सचिव प्रशांत बाणाईत यांनी केले व सुत्र संचालन प्रा.डॉ.नरेंद्र महाले सर यांनी केले व आभार प्रदर्शन अध्यक्ष संजय बोरसे यांनी केले तसेच कार्यक्रम प्रसंगी उपास्थित संपुर्ण नाभिक संघ भुसावळ शहर पुरुष व महिला कार्यकारणी उपास्थित होते.नाभिक समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.