यावल कृ.उ.बा. निवडणुकीत 18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात : काँग्रेस आघाडी व भाजपा सेना युती सरळ लढत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 5 अपक्ष उमेदवार रिंगणात

यावल (सुरेश पाटील)

यावल कृषी उत्पन्न बाजार   समितीच्या पंचवार्षिक निवडणुक संचालक मंडळाच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा शिवसेना आघाडी आणि भाजपा शिंदे गट शिवसेना यांच्यात सरळ लढत होणार आहे तसेच या निवडणुकीत 5 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.[ads id="ads1"] 

     यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत 144 नामांकन दाखल झाले असता 4 नामांकन अवैध ठरवण्यात आले होते, माघारीच्या दरम्यान 100 नामांकन माघार झाल्यामुळे आता निवडणूक रिंगणात 41 उमेदवार आहेत या निवडणुकीत मात्र सत्ताधाऱ्यांनी म्हणजेच भाजप सेना युतीच्या मंडळींनी सत्तेचा व आपल्या प्रभावाचा वापर करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली ( एका जागेवर तर कायदेशीर रित्या अपात्र उमेदवार असताना, सर्वांना ज्ञात असताना सुद्धा त्याच्यासाठी एका तरुण पदाधिकाऱ्याला माघार घ्यावी लागल्याने सत्तेचा आणि दबाव तंत्राचा वापर कसा केला जातो,आणि विरोधक कसे गप्प बसतात..? हे राजकारणातून तालुक्यातील जनतेला अनुभवास आले. ) जुन्या अनुभवी आणि प्रबळ उमेदवारांना माघार घ्यावी लागल्याने तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत,काँग्रेस मधील प्रबळ उमेदवारांना माघार घ्यावी लागल्याने तालुक्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. [ads id="ads2"] 

   तसेच काँग्रेसच्या काही दिग्गजांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्यामुळे दोन-तीन जागांवर चुरस निर्माण होईल,सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात सात जागांसाठी 14 उमेदवार सरळ लढत आहेत त्यात भाजपा शिंदे गट यांचे दीपक नरोत्तम चौधरी पंकज चौधरी,राकेश फेगडे,सागर महाजन,हर्षल पाटील,संजय पाटील,उमेश पाटील तर याच मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि  शिवसेना गटा तर्फे बराटे ज्ञानेश्वर,भानुदास चोपडे,केतन किरंगे, अनिल साठे,प्रदीप पाटील,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विनोदकुमार पाटील,तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे,

सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघात भाजपा तर्फे कृषी भूषण नारायण चौधरी तर काँग्रेस आघाडी तर्फे योगेश पाटील, यांच्यात सरळ लढत होणार आहे,सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघात सरळ लढत होत असून भाजपा युतीतर्फे बराटे राखी,फालक कांचन,तर काँग्रेस आघाडीतर्फे चौधरी नयना, आणि महाजन नंदा, यांचा समावेश आहे

सहकारी संस्था वि.जा.भ.ज. मतदार संघात भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत पाटील, तर काँग्रेस तर्फे अनिल पाटील यांच्या सरळ लढत होणार आहे.

     ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघात एका जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत त्यात काँग्रेस भाजपाची सरळ लढत होत असून सेना-भाजपतर्फे कोळी दगडू तर काँग्रेस तर्फे सुलेमान तडवी तर अपक्ष म्हणून सोनवणे योगराज यशवंत आणि तडवी सत्तार सुभान हे रिंगणात आहेत

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात एका जागेसाठी सरळ लढत होत आहे यात भाजपा तर्फे यशवंत तळेले तर काँग्रेस तर्फे पौर्णिमा भंगाळे यांच्यात लढत होत आहे.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात दोन जागांसाठी 6 उमेदवार रिंगणात असून त्यात दोघे अपक्ष सुद्धा रिंगणात उतरले आहेत भाजपा सेना तर्फे सूर्यभान पाटील आणि विलास पाटील हे रिंगणात उतरले आहेत त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसचे सुनील  फिरके व शेखर पाटील काँग्रेस आणि अपक्ष म्हणून नंदकिशोर सोनवणे व यशवंत सपकाळे हे सुद्धा रिंगणात आहे.

व्यापारी मतदार संघात 2 जागांसाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत काँग्रेस तर्फे अशोक चौधरी व सय्यद युनूस सय्यद युसुफ हे आहेत. तर त्यांना शह देण्यासाठी भाजपाचे यावल शहर अध्यक्ष निलेश गडे व जितेंद्र  चौधरी व अपक्ष उमेदवार नरेंद्र पाटील हे रिंगणात उतरले आहेत तर हमाल मापारी  मतदारसंघात एका जागेसाठी सरळ लढत होत असून सचिन पंढरीनाथ बारी हे भाजपा तर्फे विद्यमान शिवसेना कार्यकर्ता तथा संचालक सुनील वासुदेव बारी यांना निवडणुकीत हॅट्रिक पासून रोखण्यासाठी रिंगणात आहे.

दिग्गजांची माघार-

यात तालुक्यातील प्रशांत लीलाधर चौधरी,निर्मला राजेंद्र महाजन,ज्योती सुनील नेवे,विद्यमान सभापती मुन्ना उर्फ तुषार सांडू सिंग पाटील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जीवराम महाजन माजी सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे, पांडुरंग सराफ,माजी उपसभापती पंचायत समिती उमाकांत पाटील,जिल्हा बँकेचे माजी संचालक गणेश नेहते,दहिगाव उपसरपंच देविदास पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र पाटील,शरद कोळी, संतोष खर्चे,जगदीश कवडी वाले,वड्री सरपंच अजय भालेराव,परसाळे सरपंच मीनाताई तडवी,दीपक पाटील,अंजाळे माजी सरपंच मनीषा सपकाळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील, भाजपाचे युवक तालुका अध्यक्ष सागर कोळी, यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शंभर उमेदवारांनी माघार घेतली.

    यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल प्रचार शुभारंभ नारळ फोड़ण्यासाठी सकाळी  हनुमान मंदिर सुना सावखेडा येथे नारळ वाहण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडी कडून कळवण्यात आले आहे.कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!