जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ग्रामपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणामुळे बहुतांश ठिकाणी महिला पदाधिकारी कार्यरत आहेत.जळगाव जिल्ह्यासह राज्यातील मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य कार्यरत असले तरी ते मुख्य प्रवाहात नाहीत,असे चित्र आहे.राखीव जागांवर निवडून गेलेल्या सदस्यांनी प्रभावी काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महिला - पुरुष सरपंचांनी अखिल भारतीय सरपंच परिषदेत संघटित होवून काम करावे असे आवाहन सरपंच परिषदेचे अनुसूचित विभागाचे राज्य समन्वयक राजीव सवर्णे यांनी केले आहे.[ads id="ads1"]
निंभोरा सिम (ता.रावेर) येथील माजी सरपंच आणि समता परिषदेचे अध्यक्ष राजीव सवर्णे यांची नुकतीच जळगाव येथे झालेल्या सरपंच परिषदेच्या चर्चासत्र कार्यक्रमात संघटनेच्या राज्य समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि सरचिटणीस विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना येणाऱ्या अडचणी,विविध योजनांची अंमलबजावणी करतांना शासनाशी समन्वय साधणे, सरपंचांना न्याय मिळवून देणे आदीबाबत संघटनेचे काम सुरू आहे.[ads id="ads2"]
मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या अनेक योजना अद्याप सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही.त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना प्रशिक्षण कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती राजीव सवर्णे यांनी देवून अखिल भारतीय सरपंच परिषदेत अनुसूचित जातीचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करून अधिक माहितीसाठी
9822059249 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे एका प्रसिद्धी पत्रान्वये कळवले आहे.


