२ एप्रिल,२०२२ रविवार रोजी सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या माध्यमातून " ११ एप्रिल - राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी मिळालीच पाहिजे " या विषयासंदर्भात ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील सामाजिक, राजकिय तथा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. [ads id="ads1"]
सभेच्या प्रस्ताविकात सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक डॉ.सुरेश झाल्टे यांनी भारतातील थोर समाज सुधारक - शिक्षण क्रांतीचे प्रणेते - स्त्री शिक्षणाचे जनक - विचारवंत क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे महान कार्य पाहून ११ एप्रिलला शासकीय सुट्टी मिळाली पाहिजे असे प्रदिपादन केले. या ऑनलाईन सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेश राठोड उपस्थित होते. या ऑनलाईन गुगल मिट मिटींगला जवळ - जवळ ७८ प्रतिनिधी महाराष्ट्रातील उपस्थित होते. [ads id="ads2"]
यामध्ये सटाण्याचे यशवंत जाधव, गडचिरोली येथून प्रा.दशरथ आधे, परभणीतून डॉ.सुनील जाधव, नंदुरबारहुन नथू काशिनाथ माळी, औरंगाबाद येथून प्रा. वसंत ठाळकर, जळगाव खान्देश मधून प्रमोद पाटील सर, अँड रविंद्र गजरे व संतोष महाजन, नांदेड येथून श्याम निलंगेकर अशा प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींनी तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांचे शैक्षणिक - सामाजिक कार्य व शेतकऱ्यांविषयीचे विचार व्यक्त केले तसेच सुटी संदर्भात आपापली भूमिका मांडली आणि येत्या ११ एप्रिल ला निबंध, वकृत्व, रंगभरण, चित्रकला, अशा विविध स्पर्धा घेऊन तसेच पथनाट्य, प्रबोधन, व्याख्यान, एकपात्री नाटिका असे विविध कार्यक्रमांनी तात्यासाहेबांची जयंती साजरी करूया.
सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांनी आपली भूमिका मांडताना सत्यशोधक समाज संघाला शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५० वर्षे पूर्ण होत आहे. तात्यासाहेबांचे कार्य सूर्यासारखे तेज आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संघटनांनी आपापल्या लेटरहेडवर ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांना संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ५ एप्रिल, २०२३ ला निवेदन देणार असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रमेश राठोड यांनी आपल्या सर्वांचा एकच ध्यास ११ एप्रिल रोजी सुट्टी मिळावी यासाठी सर्व पत्रकार बांधव यांनी पाठपुरावा करावा आपण सर्व मिळून शासनाला विनंती करूया असे प्रतिपादन केले.
या ऑनलाईन सभेचे सूत्रसंचलन नागपुरच्या सत्यशोधक महिला महासंघाच्या अध्यक्षा वंदना वनकर तर आभार जळगाव खान्देश चे प्रमोद पाटील यांनी मानले.


