जळगाव जिल्हा प्रतीनिधी (हमीद तडवी) जि.प.प्राथमिक शाळा कुसुंबे ता-रावेर येथील उपशिक्षक श्री दिलीप श्रावण पाटील सर यांची ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून आभोडे बु.शाळेवर पदोन्नती झाल्याने आज कुसुंबा शाळेची शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक स्टाफ व गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांतर्फे त्यांनी कुसुंबा शाळेत केलेल्या कार्याचा गौरव करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. [ads id="ads1"]
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री साहेबू तडवी,से.नि.शिक्षक जगन्नाथ अजलसोंडे.दोन्ही गावातल सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक पोलीस पाटील,शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,व सदस्य व गावातील शिक्षण प्रेमी नागरिक व शिक्षक स्टाफ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्री नारायण घोडके, प्रदिप सपकाळे,रूबियाना तडवी, जगदीश, महाजन,साहेबू तडवी,जगन्नाथ अजलसोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
यावेळी नारायण घोडके,प्रदिप सपकाळे,रूबियाना तडवी, महेंद्र महाजन, संदीप महाजन,संगीता कचरे,पुनम पाटील, सुनील महाजन,राजू तडवी, फरीद तडवी, सुधीर पाटील,मुकेश पाटील, रमेश भालेराव,दत्तू महाजन, मेहेरबान तडवी,प्रमोद कचरे, सतिश पाटील, जगन्नाथ अजलसोंडे, सुरेश चौधरी,अफशाना तडवी, पत्रकार हमीद तडवी, उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, मुख्याध्यापक श्री साहेबू तडवी, जितेंद्र नारखेडे,विजय गोसावी,दिपक कोंडे, विठ्ठल भुतेकर, कल्पेश पाटील,अरबीन तडवी सर यांनी परिश्रम घेतले.


