जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा): सरपंचपद रद्द होण्यासाठी अर्ज केल्याच्या रागातून सहा जणांनी तरुणाला बेदम मारहाण करीत चाकूने हातावर वार केला. ही घटना जळगाव तालुक्यातील कानळदा (Kanlada Taluka Jalgaon) येथे घडली. या संदर्भात जळगाव तालुका पोलिसात(Jalgaon Taluka Police Station) रविवारी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]
तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला
जळगाव तालुक्यातील कानळदा (Kanlada Taluka Jalgaon) गावातील आनंद सपकाळे यांनी कानळदा गावातील सरपंच (Sarpanch) पुंडलिक सपकाळे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यात सरपंचपद रद्द करावे, अशी मागणी जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector)यांच्याकडे करण्यात आल्याने त्याचा राग मनात ठेवून [ads id="ads2"] निखील संतोष सपकाळे, विलास नारायण सपकाळे, पुंडलिक तुळशीराम सपकाळे, प्रमोद मधुकर चव्हाण, राजू मिस्तरी आणि नारायण शंकर सपकाळे (सर्व राहणार कानळदा, तालुका जळगाव) यांनी आनंद सपकाळे यांचा भाचा चेतन विजय साळुंखे (25, रा.कानळदा) यास छोट्या चाकूने गंभीर दुखापत केली तर इतरांनी चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या संदर्भात रविवारी रात्री नऊ वाजता जळगाव तालुका पोलिसात (Jalgaon Taluka Police Station) सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहे.


