सहा.आयुक्त समाज कल्याण मार्फत युवकांना उद्योजकता प्रशिक्षणाचे धडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 फैजपूर तालुका यावल प्रतिनिधी(सलीम पिंजारी )

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे-जिल्हा जळगाव व सहा. आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय पर्व-२०२३ च्या अनुषंगाने "स्वयं सहाय्यता युवा गट उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा" आयोजित करण्यात आलेली होती. मा.सहा.आयुक्त श्री.योगेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यशाळा संपन्न झाली. [ads id="ads1"]  

कार्यशाळेच्या सुरुवातीला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांकडून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री.युनुस तडवी (प्रकल्प अधिकारी, बार्टी) यांनी केले त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. [ads id="ads2"]  

सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षा मा.मनिषा पाटील मॅडम (सहा.लेखाधिकारी सहा.आयुक्त स.क.विभाग) यांनी युवाटातील सदस्यांना येणाऱ्या अडचणींवर तोडगा व उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तदनंतर मा.एस.ए.साळूंखे सर (व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र) यांनी समतादूत व युवागटांना विशेष प्रशिक्षण देऊन शासनाच्या CMEPG योजनेची परिपूर्ण अंमलबजावणी करून युवागट सदस्यांना या योजनेत प्राधान्यक्रम देण्यात येईल असे आश्वासित करून विविध प्रकारच्या प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर मा.देवेंद्र महाजन सर (प्रशिक्षक-जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI) यांनी विविध प्रशिक्षणासाठी युवागट सदस्यांना विविध प्रशिक्षणांची माहिती देत मार्गदर्शन केले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक मा.कसबे सर, वसंतराव नाईक महामंडळाचे मा.शालीनी वैष्णव मॅडम, संत रोहिदास महामंडळाचे मा.भावसार सर, ओ.बी.सी महामंडळाचे राठोड सर, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळाचे मा.रोहिदास पाटील सर यांनी आपापल्या महामंडळातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

सदरील कार्यक्रमास; मा. करनसिंह सोलंकी (प्रशिक्षक-जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था R-SETI), मा.एल.बी.तावडे सर (उद्योग निरिक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, मा.महेंद्र चौधरी सर (निरिक्षक सहा.आयुक्त स.क.विभाग), मा.वाणी सर (अधिक्षक सहा.आयुक्त स.क.विभाग),मा.शशांक जाधव सर (निरिक्षक सहा.आयुक्त स.क.विभाग), मा.समीर क्षत्रिय सर (निरिक्षक सहा.आयुक्त स.क.विभाग), मा.उनवणे सर (निरिक्षक सहा.आयुक्त स.क.विभाग), व सर्व निरिक्षक तथा वरिष्ठ अधिकारी कर्मचारी, तालुका समन्वयक, समतादूत प्रकल्प अधिकारी व समतादूत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत शिल्पा मालपूरे यांनी केले तर आभार प्रकल्प अधिकारी युनुस तडवी यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!