यानंतर अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी काजल तायडे हिने आपले तीन वर्षात कालावधीतील शैक्षणिक अनुभव कथन केले यानंतर इंगळे अमोल यानेही आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्राध्यापक उमरीवाड यांनी आपल्या मनोगतात असे म्हटले की विद्यार्थी हा महाविद्यालयाचा एक अविभाज्य घटक असून प्रथम गुरु आई- वडील आणि त्यानंतर शिक्षक यांचा आशीर्वाद हा महत्त्वाचा असतो, जीवनात नेहमी संगत चांगली असावी असे म्हटले. अध्यक्षीय भाषणात अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर नीता वाणी यांनी जीवनात चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा, वाईट गोष्टी अंगी कारू नका आई-वडील तसेच शिक्षक आणि देशाचे ऋण आपण विसरू नका चांगले नागरिक बना असे म्हटले. [ads id="ads2"]
कार्यक्रमात तृतीय वर्ष तसेच एम. ए अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी आणि प्रथम वर्षाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते याबरोबर प्रा.डॉ. एम. के.सोनवणे यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे.बी.अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले तसेच हर्षल पाटील आणि श्रेयस पाटील यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक ज्ञानेश्वर कोळी यांनी केले तर आभार शेवटी तृतीय वर्षाचा विद्यार्थी प्रशांत पाटील यांनी मानले.


