सत्यशोधकि विचारांनी सामाजिक क्रांतिची बीजं अधिक प्रभावी होतील : जयसिंग वाघ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


नशिराबाद :- या देशातील महान समाजोद्धारक क्रांतिबा महात्मा फुले यांनी या देशात सत्यशोधकि विचार देऊन सामाजिक क्रांतिची बीजं पेरली आहेत, या देशात जो कोणी सामजिक क्रांति करु इछिल त्यास सत्यशोधकि विचार अव्हेरुन पुढं जाताच येणार नाही , सत्यशोधकि विचारांनी सामाजिक क्रांतिची बीजं अधिक प्रभावी होतील असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.[ads id="ads1"] 

        सत्यशोधक समाज संघ चे जिल्हाध्यक्ष विजय लुल्हे यांनी त्यांच्या वडिलांच्या द्वितीय स्मृति दिनी फुले - आम्बेडकर संयुक्त जयंतीचे आयोजन नाशिराबाद येथील संत सावता माळी नागरातील माळी पंच सभागृहात केले असता वाघ बोलत होते.[ads id="ads2"] 

        वाघ यांनी सांगितलेकी एखाद्या व्यक्तिच्या स्मृतिदीनानिमित्त महापुरुषांची जयंती साजरी करुन विजय लुल्हे यांनी अत्यंत स्तुत्य व आदर्शवत कार्य केले आहे , असा कित्ता इतरांनि रुजविला तर नक्की समाज परिवर्तन होईल.

        सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ. सुरेश झालटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की महात्मा फुले यांनी शेतकरी चळवळ ऊभी करुन त्यांची होणारी पिळवनुक  जगा समोर मांडली व या देशात नवी क्रांति केली . आज सुद्धा शेतकरी व समाजातील असंख्य मानसं भरडली जात आहेत पण या विरुद्ध कोणी आवाज उठवित नाही . आज सुद्धा या देशात फुले - आम्बेडकर यांच्या विचारांची सामाजिक क्रांति करणे गरजेचे आहे व या करीता आपण जाती , धर्म विसरून एकत्र येणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले .

       कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पंचायत समिति सदस्या आशाताई माळी होत्या , त्यांनी आपल्या भाषणात कर्मकांड विरुद्ध विचार मांडून महिला या अधिक धार्मिक , भावनिक असतात त्यांनी आपल्या पासून समाजपरिवर्तन केले तर या देशात सामाजिक क्रांति नक्की यशस्वी होउ शकते असे सांगितले .

     या प्रसंगी मंचावर संगीता माळी , सिंधु सुतार , माजी सरपंच विकास पाटिल , लालचंद पाटिल , मुकुंद सपकाळे , डॉ. मिलिंद बागुल ई. मान्यवर हजर होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटिल , प्रास्ताविक विजय लुल्हे , स्वागत बाळकृष्ण लुल्हे ,समीक्षा लुल्हे , देवश्री तांबट , पंढरीनाथ महाजन , प्रकाश महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विश्वनाथ महाजन यांनी केले.

     या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सत्यशोधकि प्रार्थना म्हटली , मान्यवारांचा सत्कार शाल , बुके व महापुरुषांचे पुस्तक देऊन करण्यात आला . कार्यक्रमास स्त्री पुरूष मोठ्या संखेने हजर होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!