सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त हेडगेवार नगर या गावी प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न !....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



महामानव अखिल विश्वाची मालमत्ता, त्यांना जाती - जातीत विभागू नका - सत्यशोधक मोतीराळे सर

भारतातील अर्थव्यवस्थेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत - सत्यशोधक अँड रविंद्र गजरे सर

धरणगांव प्रतिनिधी - पी.डी.पाटील

धरणगांव - तालुक्यातील हेडगेवार नगर या गावी भारतातील थोर समाज सुधारक, राष्ट्रपिता, महात्मा जोतीराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सत्यशोधक मोतीराळे सर म्हणाले समाजासाठी, देशासाठी त्याग,तपस्या, बलिदान,समाजसेवा व विद्वत्ता असणा-यांनाच भारतरत्नाचा सन्मान शोभून दिसतो. सर्वच चामड्याचे आहेत, रक्त लाल आहे, हाडामासांचे समान आहेत तर माणसा-माणसामध्ये भेद का करता असे संत रविदासांनी बाराव्या शतकात सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली असे प्रतिपादन मोतीराळे यांनी केले.[ads id="ads1"] 

       मोटीवेशनल वक्ते अँड.रविंद्र गजरे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवले, गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवले. डॉ बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे नेते नसून ते संपूर्ण भारताचे नेते होते त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि त्यांच्या प्रॉब्लेम आँफ रूपीज या ग्रंथामुळे आज आपल्या भारताची अर्थव्यवस्था चालत आहे अशा दूरदृष्टीच्या महामानवाला वंदन केले.[ads id="ads2"] 

           कार्यक्रमाला डी आर पाटील (मा सिनेट सदस्य), सी के पाटील, (सचिव काँग्रेस पार्टी), सुनील चौधरी (समाजभूषण), डी एस पाटील, दिपक वाघमारे (मा नगरराध्यक्ष), शिरसाट मँडम (उप मुख्याध्यापक), व दीक्षा गायकवाड (अध्यक्ष जयंती उत्सव समिती) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

       कार्यकमाचे प्रास्ताविक प्रा. सावळे सर यांनी केले व सूत्रसंचालन सुधाकर मोरे सर यांनी केले.कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संयुक्त जयंती उत्सव समितीचे सदस्य व ग्रामपंचायत रहिवासी उपाध्यक्ष सुशिला केदार,  सचिव उषाताई बाविस्कर, सदस्य नीलम शिरसाठ, सदस्य रविंद्र कढरे, अविनाश बाविस्कर, प्रदीप बाविस्कर, विजय बाविस्कर, वैभव बोरसे, दीपक शिरसाट, प्रा.सपकाळ व प्रा. गायकवाड यांनी परिश्रम घेतले. एस.डी.मोरे यांनी सर्व देगणीदांराचे मान्यवरांचे, श्रोत्यांचे व कार्यकत्यांचे आभार मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!