भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील राखेच्या बंडाजवळ पाईप चोरी ; तीन जणा विरुद्ध गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ (सुमित निकम) तालुक्यातील विल्हाळे येथील राखेच्या बंडाजवळ दिपनगर . औष्णिक विद्युत केंद्राच्या पाईप चोरी प्रकरणी पिंपळगांव खुर्द येथील तीन जणा विरुद्ध वरणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राजेश हरी तळेले , रा. किन्ही वय 30 ' कनिष्ठ सुरक्षा अधिकारी दिपनगर हे 19 एप्रिल रोजी रात्री दोन वाजता पेट्रोलिंग करत असतांना वेल्हाळे शिवारातील राखेच बंडाजवळ गॅस कटरच्या साह्याने  लोखंडाची पाईपलाईन  कटिंग करताना दिसले , त्यांनी गार्ड हितेश महाजन व समाधान कोळी अशांनी सदर ठिकाणी पाईपलाईन कटिंग करत असलेले व्यक्तिवर नजर ठेवण्यासाठी थांबवले.[ads id="ads1"] 

   वरणगांव  स्टेशनला फोन लावला . त्यावेळेला पोलीस स्टेशनचे नावेद अली व योगेश पाटील हे या ठिकाणी उपस्थित झाले .दूर अंतरापर्यंत पायी चालत जाऊन घटनास्थळी गेले असता  ऋषिकेश  महाजन व सुनील जोहरे व प्रतीक जोहरे या ठिकाणी पाईप कटिंग करून पळून जाऊ लागले . सदर अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर व पाईप  घेऊन ते निघून गेले होते .यामध्ये वीस हजार रुपये किमतीचा 800 किलो वजनाचे पाईप आहेत.

 या प्रकरणी राजेश तळेले यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला खबर दिली असून ऋषिकेश महाजन सुनील जोहरे व प्रसिक जोहरे तिघे राहणार पिंपळगाव खुर्द यांच्या विरोधात वरणगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!