यावल ( फिरोज तडवी ) फिरोज तडवी तालुक्यातील डांभुर्णी येथील आझाद नगरातील रहिवाशी श्रावण लक्ष्मण कोळी वय ५५यांनी सततचे ओढवणारे नैसर्गीक संकट व या मुळे होणारी नापिकीला कंटाळुन विषारी औषद्यसेवन करुन संपवली जिवनयात्रा. [ads id="ads1"]
या संदर्भातील वृत्त असे की डांभुर्णी तालुका यावल येथे दिनांक १८ रोजी सकाळी गावातील श्रावण लक्ष्मण कोळी हे नियमितपणे आपल्या गुरा ढोराला चारा पाणी करून घरी आले व घरी आले असता अचानक त्यांना चक्कर येत असल्याचे शेजार्यांच्या लक्षात आले व त्यांनी तात्काळ श्रावण लक्ष्मन कोळी यांना खाटीवर टाकले असता त्यांना वानत्या होत असल्याने त्यांनी काही तरी विषारी औषध सेवन केले असल्याचे लक्षात येताच लागलीच उपस्थित ग्रामस्थांनी ट्रिपवर गेलेला त्यांचा मोठा मुलगा योगेश यास फोनवर माहिती देऊन घरी बोलवले व श्रावण कोळी यांना तातडीने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले .[ads id="ads2"]
मात्र दि. १९ एप्रील रोजी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. श्रावण कोळी यांनी अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या कुंटूबावर आभाळच कोसले आहे. लक्ष्मण कोळी हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी आपल्या शेतीसाह इतर शेती बटाईने करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत संसाराचे गाडे हाकत होते. मात्र मागील दोन तीन वर्षा पासून कस्ट करूनही लक्षण कोळी यांना मनासारखं उत्पन्न व वारंवार नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान, यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी घट होतांना दिसुन येत होते तसेच त्यांनी घेतलेल्या कर्जाचे ओझे डोईजड झाल्याने ते बऱ्याच दिवसा पासून कर्जबाजारीमुळे हताश झाले होते.
पुढील वर्षासाठी शेती तयार करावी म्हणून पैसा उपलब्ध नसल्याने व ब्यांक, सोसायटीचे कर्ज कशे परतफेड होईल या विचाराने त्यांनी टोकाची भूमिका घेतली असावी अशे जनतेतून बोलले जात आहे. दि. १८ एप्रील रोजी घरी कोणी नसतांना त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध घेत आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या पच्यात पत्नी, दोन मूल दोन बहिणी, जावाई नातवंड असा परिवार आसून येथील रिक्षा चालक योगेश कोळी यांचे ते वडील होते.



