नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नांदगाव तालुक्याचे सत्ताधारी आमदार सुहास कांदे व उद्धव ठाकरे गटाचे गणेश धात्र यांच्यात हाणामारी झाली.[ads id="ads1"]
गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मतदान प्रक्रिया पार पडत असताना प्रारंभी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यानंतर गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळत आहेत. यामध्ये नांदगाव तालुक्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे आणि उद्धव ठाकरे गटाचे गणेश धात्र यांचे गट सभागृहात समोरासमोर आले. [ads id="ads2"]
यावेळी अर्ज माघारीच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर या शाब्दिक चतुकीचे रूपांतर हाणामारीत झाले. मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सभागृहात अशा प्रकारची तुंबळ हाणामारी घडल्याने एक प्रकारे मनमाड शहराच्या बाजार समितीची नाचेपी झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजकारण कुठल्या थराला जाऊ शकते या निमित्ताने पाहायला मिळाले.



