जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी (Sakali Taluka Yawal Dist Jalgaon) येथील एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह शिरसाड शिवारातील (Shirsad Shivar) एका शेत विहिरीमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. [ads id="ads1"]
ही महिला ही सकाळीच घराच्या बाहेर गेली होती व नंतर तिचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात (Yawal Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सरलाबाई मनोहर अत्तरदे (वय - 55) असे मयत महिलेचे नाव आहे.[ads id="ads2"]
मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट
ही महिला बुधवारी सकाळी घराच्या बाहेर गेली होती. दरम्यान दुपारी त्यांचा मृतदेह शिरसाड शिवारातील(Shirsad Shivar) सुधाकर चित्रे यांच्या शेत विहिरीत आढळला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने यावल पोलिसांना (Yawal Police) माहिती देण्यात आली व घटनास्थळी पोलिसांचे पथक आल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढला व यावल ग्रामीण रुग्णालयात (Yawal Rural Hospital) शवविच्छेदनासाठी हलवला. या प्रकरणी यावल पोलिसात (Yawal Police Station) रवींद्र रघुनाथ अत्तरदे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.



