रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील रेंभोटा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे अवचित साधून रेंभोटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक फलकाचे अनावर रेंभोटा गावातील इंजीनियर ज्ञानेश्वर रामु गाढे याच्या हस्ते करण्यात आले. महात्मा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चार दिवशी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"]
कार्यक्रमास सरपंच सपना आनंद कोळी , जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील,उपसरपंच सुनील महाजन , विजय पाटील , पोलिस पाटील विनोद पाटील , सुरेश पाटील ,सुनील गाढे ,प्रल्हाद गाढे ,संजय गाढे , ग्रा . पं . सदस्य पंकज वाघ,ब्रिजलाल म्हसाने ,कैलास गाढे , रोहिदास गाढे ,रोशन गाढे ,योगेश गाढे , प्रेम गाढे ,संदेश गाढे , दिवाकर गाढे ,आकाश कोचूरे , पवन गायकवाड ,छोटू गाढे ,वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका महासचिव कांतीलल गाढे ,अरविंद गाढे ,रितेश तायडे व इतर असंख्य बौद्ध उपासक उपसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गाढे यांनी केले.



