भारतीय संविधान जगास मिळालेली अनमोल देणगी आहे : जयसिंग वाघ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ : -  भारतीय संविधान एक आदर्श संविधान असून जगातील इतर लोकशाहीवादी देश सुद्धा आपल्या संविधानाचा संदर्भ म्हणून वापर करतात , आपले संविधान जगातील सर्वातमोठे लिखित व आदर्श लोकशाही प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सर्वच मुल्यांचा त्यात समावेश असल्याने आपले संविधान जगास मिळालेली एक अनमोल देणगी आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.[ads id="ads1"]  

         भुसावळ येथील पांडुरंग नाथ नगर येथे डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त संविधानाच्या १३२ प्रतिंचे वाटप करण्याचा कार्यक्रम १५ एप्रिल रोजी सायंकाळी घेण्यात आला असता मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.[ads id="ads2"]  

           जयसिंग वाघ यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , स्वतंत्र भारताचे स्वतंत्र संविधान कसे असावे या बाबत डॉ. बाबासाहेबांनी १९१९ , १९२८ ला या संदर्भातिल आयोगास वेळोवेळी आपली साक्ष दिली आहे , १९३० , १९३१ , १९३२ च्या गोलमेज परिषदेत आपले विचार मांडले आहे , त्यांच्या विचारांचा प्रभाव १९३५ च्या कायद्यावर पडला आहे , पुढं दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवस संविधान निर्मितिचे काम  करुन  १ प्रास्ताविक , ८ अनुसूची , २५ भाग व ३९५ कलमं असलेली राज्यघटना बाबासाहेबांनी देशाला प्रदान केली . संविधान निर्मिति करीता  भारतीय नेते इंग्रजां बरोबर तसेच संविधान सभेत गंभीरतापूर्वक वागलेले नाहीत  स्वातंत्र्याची चळवळ चालवीणारे नेते फक्त इंग्रज हटाववादी होते असेही वाघ यांनी सोदाहरण स्पष्ट केले . 

          डॉ. वंदना वाघचौरे यांनी डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांनी महिलांच्या उन्नति करीता केलेले कार्य विस्तृतपणे सांगितले, महिलांनी आता कोणत्याही क्षेतात निःसंकोच कार्यकरुन आपला ठसा उमटवावा असे आवाहन केले .

‌         याप्रसंगी मंचावर जयसिंग वाघ , डॉ. वंदना वाघचौरे , प्रा. प्रशांत नरवाडे , एड. गौतम सालुंके , पत्रकार प्रेम परदेशी , संतोष सोनवणे , विवेक नरवाड़े , काशीनाथ जाधव , संभाजी सोनवणे , राजू सपकाळे होते . 

‌         सुरवातीस भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमांचे वाघ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले , या नंतर  आनंद सपकाळे यांनी बुद्ध वंदना घेतली . 

‌     सूत्रसंचालन संभाजी सोनवणे , प्रास्ताविक विवेक नरवाड़े , परिचय काशीनाथ जाधव तर आभार राजू सपकाळे यांनी केले , शेवटी १३२

‌संविधानाच्या प्रति जयसिंग वाघ व अन्य मान्यवारांच्या हस्ते वाटन्यात आल्या . कार्यक्रमास स्त्री पुरुष फार मोठ्या संखेने हजर होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!