ऐनपूर (विनोद कोळी) येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाचा विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.जे. बी. अंजने यांनी भूषविले. सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, प्रा. एस. आर. इंगळे, डॉ. सतीश वैष्णव, प्रा. संकेत चौधरी, श्री. पुंडलिक पाटील आणि डॉ. रेखा पाटील हे मान्यवर उपस्थित होते. [ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या सुरवातीला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर अल्ताफ पटेल, ललित पाटील, प्रियांका सोनार यांनी मनोगत सादर केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सतीश वैष्णव यांनी आपल्या मार्गदर्शनात रसायनशास्त्र विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, तसेच रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना भासणाऱ्या उणीवा विद्यार्थ्यांनि सांगाव्यात जेणेकरून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने भविष्यात त्या उणीवा भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करू असे सांगितले. [ads id="ads2"]
प्रा. एस. आर इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य, डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात संशोधन क्षेत्रात काम करून राष्ट्रविकासात सहभागी व्हावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भारती पाटील तर आभार प्रदर्शन अल्ताफ पटेल या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


