पिंप्री सेकम परिसरातील भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी संघर्ष समितीचे पंपिंग हाऊस जवळ आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 दीपनगर (सुमित निकम)  भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम   परिसरातील भारनियमन कायमस्वरूपी बंद करावे यासाठी दिपनगर येथील पंपिंग हाऊस कालव्याजवळ   शेतकऱ्यां तर्फे आंदोलन सुरू करण्यात आले आहे . पंपाचे आठ ते दहा तासाचे भारनियमन रद्द करण्यात यावे . यासाठी ग्रामस्थांनी विद्युत मंडळाला अर्ज देऊन सुद्धा त्यांनी रद्द केले नसल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे.[ads id="ads1"]  

सदरचे  गाव  हे दिपगरच्या प्रकल्पाच्या पासून बाधित असलेले गाव असून प्रकल्पापासून होणारे प्रदूषण , प्रकल्पातून होणारे राख प्रदूषण प्रकल्पात मधून जाळल्या जाणाऱ्या कोळशामुळे तापमानात ४० ते ४५ . सेटींग्रेड पर्यत मोठ्या प्रमाणात वाढ होत  असल्याने ऊस व इतर पिके यास वेळोवेळी पाणी द्यावे लागते.[ads id="ads2"]  

या ठिकाणी भारनियमन  केल्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले असून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते . या कारणाने सदर आंदोलन करण्यात आले असून त्वरित भारनियमन रद्द करावे अशी मागणी केली आहे.

   प्रशासनाने सदर मागणी पूर्ण नाही केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले .यावेळी संघर्ष समितीचे रमाकांत चौधरी व इतर उपस्थित होते मागणीच्या प्रती लोक संघर्ष नेत्या प्रतिभा शिंदे , अभियंता दिपनगर , तालुका पोलीस स्टेशन यांना पाठविण्यात आल्या आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!