"रावेर येथिल फिरत्या न्यायालयात एकवीस खटले निकाली तर एक संसार पुन्हा फुलविण्यात यश "

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर - महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण व रावेर तालुका विधीसेवा समिती यांचे तर्फे दि.१५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या फिरत्या लोकन्यायालयाच्या गाडीचे रावेर न्यायालययात प्रमुख न्यायाधीश श्री. पी. पी. यादव यांचे हस्ते उद्घाटन व पूजन करण्यात आले. त्यानंतर फिरते लोकन्यायालय निंभोरा बु येथे आयोजित करण्यात येऊन सदर फिरते लोक न्यायालयात एकूण एकवीस खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले.[ads id="ads1"]  

  तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत दाखल खटल्यात पती पत्नीचे मनोमिलन होऊन पुन्हा संसार फुलविण्यात यश आले. तसेच विविध खटल्यांमधून रक्कम रुपये सात हजार सहाशे दंड वसूल करण्यात आला. यावेळी पंच सदस्य म्हणून ऍड. दिपक तायडे यांनी काम पाहिले.फिरत्या लोकन्यायालाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री. पी. पी. यादव होते. यावेळी ऍड. धनराज ई. पाटील यांनी बाल विवाह प्रतिबंध कायद्या बाबत तर ऍड. रमाकांत महाजन यांनी नागरिकांचे संविधानात्मक मूलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत सविस्तर माहिती दिली.[ads id="ads2"]  

  कार्यक्रमास जेष्ठ वकिल ऍड. व्ही. पी. महाजन, निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गणेश धुमाळ, रावेर वकिल संघाचे अध्यक्ष ऍड. शीतल जोशी, उपाध्यक्ष ऍड. बी. डी. निळे,सचिव ऍड. दिपक गाढे, सहाय्यक सरकारी वकिल दुट्टे,निलेश लोखंडे, ऍड. योगेश गजरे, ऍड. सुभाष धुंदले, ऍड. स्वप्नील सोनार, ऍड. अतुल चौधरी, ऍड. मोहन कोचुरे,ऍड. तुषार चौधरी, ऍड. सागर तायडे, ऍड. गचके, निंभोरा सरपंच सचिन महाले, तंटा मुक्ती अध्यक्ष दिगंबरशेठ ढाके,माजी सरपंच प्रल्हादभाऊ बोंडे, ग्राम पंचायत सदस्य मनोहर तायडे,रावेर न्यायालयाचे सहा. अधीक्षक श्री. सोनवणे, वरीष्ठ लिपिक बी. के. तडवी, विधी सेवा समितीचे लिपिक भरत बारी, पोलीस कॉन्स्टेबल दुर्योधन सावळे, बाविस्कर यांचे सह पक्षकार व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऍड. शीतल जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन ऍड. योगेश गजरे यांनी केले व आभार ऍड. दिपक तायडे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!