दीपनगर ता.भुसावळ (सुमित निकम) महामार्गावरील साकरी फाटा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती . तर पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांचे तिन पथके तपास कामी रवाना केले होते . त्यानुसार वरणगांव व डिवायएसपी कार्यालयातील पथकाने रविवारी पहिला आरोपीला वरणगांव परिसरातून ताब्यात घेतले . तर लगेच दुसऱ्या दिवशी भुसावळ पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कंडारी गावातुन उर्वरीत दोन आरोपींना ताब्यात घेतल्याने गोळीबार घटनेचा लवकरच उलगडा होणार आहे .[ads id="ads1"]
दि .१४ एप्रील रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास महामार्गावरील साकरी फाटा उड्डाण पुला लगत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी स्विप्ट कार अडवून अक्षय सोनवणे व मंगेश काळे यांच्यावर गोळीबार करून पसार झाले होते . या घटनेची पोलीसांना माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जख्मींना गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले . तसेच घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट देवून पोलीसांचे तिन पथके आरोपीतांच्या तपास कामी रवाना केले .[ads id="ads2"]
वरणगांव पथकातील सपोनि आशिषकुमार आडसुळ, पोऊनि परशुराम दळवी, पोकॉ . भुषण माळी, डिवायएसपी कार्यालयातील पोहेकॉ . सुरज पाटील, रमण सुरळकर, पो. ना . यासीन पिंजारी यांनी सुसरी, आचेगांव, भानखेडा या गावात व परिसरात आरोपींचा शोध घेतला असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वरणगांवातील जुन्या महामार्गावर असलेल्या सान्वी हॉटेल येथे एक आरोपी येणार असल्याने त्यांनी नाकाबंदी करीत हॉटेल लगत सापळा रचला असता सांयकाळी उशिरा गोळीबाराच्या घटनेतील आरोपी करण संतोष सपकाळे येताच पोलीसांनी त्याला ताब्यात घेवून रात्री तालुका पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले .
दुसऱ्या दिवशी दोन्ही आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात
दुसऱ्याच दिवशी सोमवारी डिवायएसपींचे पथक व जळगांव एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे भुसावळ शहराचे उपनगर असलेल्या कंडारी गावातील भिलवाडीतुन संतोष शंकर सपकाळे व जिवन रतन सपकाळे यांना दुपारच्या सुमारास सापळा रचून ताब्यात घेतले . या घटनेचा वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि . विलास शेंडे, सपोनि . प्रकाश वानखेडे, अमोल पवार, पोहेकॉ . संजय तायडे तपास करीत आहेत


