उद्धव ठाकरे हे२३ एप्रिलला सकाळी अकराला विमानाने जळगाव विमानतळावर येतील. नंतर मोटारीने पाचोरा येथे रवाना होतील. पाचोरा येथे माजी आमदार (स्व.) आर.ओ. (तात्या) पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण, मायकोरायझा लॅब चे उद्घाटन नंतर जाहीर सभा घेतील.[ads id="ads1"]
या दौरा नियोजनासाठी १५ व १६ एप्रिल रोजी ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगाव व पाचोरा येथे येत आहेत. हा दौरा यशस्वितेसाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी आता पासूनच मेहनत घेऊन जास्तीत जास्त सभा मोठी होण्यासाठी कंबर कसली आहे.[ads id="ads2"]
माजी मुख्यमंत्री ठाकरेंचा असा आहे दौरा.
सकाळी ११- जळगाव विमानतळावर आगमन.
नंतर पाचोऱ्याकडे वाहनाने प्रयाण करतील
१२.३० : पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात आगमन
१ ते २ -भोजन
२ ते ३ -विश्रांती
३ ते ४ - राखीव
४.३०- तात्यासाहेब आर.ओ.पाटील प्रयोगशाळेचे उदघाटन
५.१५ - तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे उदघाटन
६.१५- एम.एम.महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा
८.००- जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना