सत्यशोधक समाज संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगांव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) -  सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे  विश्वभुषण भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने रेल्वे स्टेशन जळगाव समोरील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनाप्रसंगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,ऑल इंडिया सेन समाज,देवकाई प्रतिष्ठान संघटना सोबत होत्या.याप्रसंगी बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.[ads id="ads1"]  

  कार्यक्रमाचे संयोजक तथा सत्यशोधक समाजाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे ,सत्यशोधक समाजाचे प्रचारक रवींद्र तितरे व सुरेश सपकाळे,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे समन्वयक ह.भ.प.मनोहर खोंडे ,सभासद राजकुमार गवळी , देवकाई प्रतिष्ठान अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे सर , पुस्तक भिशीचे सुदाम बडगुजर ,युवराज वाघ कार्यकर्ते उपस्थित होते.[ads id="ads2"]  

     बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने मानवंदना देणाऱ्या भीमसागराला भर उन्हात थंड पाण्याची निःशुल्क सेवा आम आदमी पार्टी युवा आघाडी जळगाव तर्फे देण्यात आली.थंड जल क्षुधाशांती सेवा दिल्याच्या सन्मानार्थ सेवार्थी आप युवा आघाडी जिल्हाध्यक्षा अमृताताई  नेतकर मॅडम यांचा सत्यशोधक समाज संघातर्फे मनोहर खोंडे ( प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया सेन समाज ) यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी सत्यशोधक समाजाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे तसेच आप युवा आघाडीचे कार्यकर्ते वकिल विजय दाणेज , माधवराव जाधव , मयुर पाटील कार्यकर्ते यांसह मित्र परिवार उपस्थित होता.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!