धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते त्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री.बी.डी.शिरसाठ, श्री.जी.आर.सूर्यवंशी, पर्यवेक्षक श्री.कैलास वाघ आणि उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ यांनी डॉ.बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची महती सांगितली.[ads id="ads2"]
डॉ. सोनवणे यांनी आधुनिक भारतासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आवश्यकता प्रतिपादन केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी मेजर श्री.डी.एस.पाटील यांनी तर आभारप्रदर्शन श्री. एस.के.बेलदार यांनी केले. याप्रसंगी शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.