भुसावळ येथे 30 मे रोजी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ  ( सुवर्ण दिप वृत्तसेवा )   भुसावळ येथे येत्या  दि. ३० मे रोजी सप्तखंजिरीवादक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.[ads id="ads1"] 

    भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या  संयुक्त जयंती सोहळा निमित्त  सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचा भव्य प्रबोधनात्मक फुले शाहु आंबेडकरी विचारांच्या किर्तनाचा कार्यक्रम राजरत्न तायडे हेल्पिंग फाऊंडेशन, भुसावळच्या वतीने व राजूभाऊ सूर्यवंशी, विनोद भाऊ सोनवणे, बाळाभाऊ पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच तक्षशिला नगर रहिवासी रमा रत्न महिला मंडळ तक्षशिला नगर, भीम ज्योत मंडळ, गोलानी परिसर भुसावळ, प्रागतिक विचार मंच भुसावळ, त्रिरत्न बुद्ध विहार निंभोरा व सर्व ग्रामस्थ मंडळी भुसावळच्या सहकार्याने  आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ठिक ६.०० वाजेला सुरु होईल.[ads id="ads2"] 

  तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की, मोठ्या संख्येने आपण या ऐतिहासिक विचारांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  दीपरत्न तायडे अध्यक्ष राजरत्न तायडे हेल्पिंग फाऊंडेशन फाऊंडेशन, भुसावळ,तसेच तक्षशिला नगर रहिवासी रमा रत्न महिला मंडळ तक्षशिला नगर, भीम ज्योत मंडळ, गोलानी परिसर भुसावळ, प्रागतिक विचार मंच भुसावळ, त्रिरत्न बुद्ध विहार निंभोरा व सर्व ग्रामस्थ मंडळी भुसावळच्या सहकार्याने  आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला सौजन्य सिद्धेश इलेकट्रोमेक कं . भुसावळ यांचे लाभले आहे.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!