विज्ञान शाखेत शेख सोहेल प्रथम तर मिस्बाह शेख द्वितीय
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा : रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इकबाल हुसैन मल्टीपर्पस फाउंडेशन संचालित डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेचा यंदा(एच. एस.सी)परीक्षेत १०० टक्के निकाल लागला असून फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता १२ वीचा निकाल ऑनलाईन पध्दतीने जाहिर झाला.[ads id="ads1"]
यात सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथील १२ वी विज्ञान शाखेतील शेख सोहेल शेख कलिम या विद्यार्थीने प्रथम क्रमांक तर मिस्बाह कारिया शेख शफीक या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकवले असून,शेख दानियाल शेख शरीफ या विद्यार्थिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.[ads id="ads2"]
यासोबत सदरील शाळेचा यंदा शंभर टक्के निकाल लागला असून,या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.हाजी हारून शेख इक्बाल,प्रिन्सिपल लक्ष्मी पल्लीवार मॅडम,शादाब अहमद सर,हाजी हारुन सेठ फाउंडेशनचे अध्यक्ष शेख नाजीम,सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती