यावल (फिरोज तडवी)
कोरपावली तालुका यावल येथून जवळचं असलेल्या दहिगाव ता यावल येथील चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण भागातील खड्याला आग लागून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास घडली सुदैवाने प्राणहानी टळली.[ads id="ads1"]
दहिगाव येथील अरुण जंगलू अत्तरदे यांचे चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण प्लॉट भागालगतच्या खड्यात आज दुपारी साडेतीन वाजेची सुमारास अचानक आग लागल्याने गुरांचा चारा कुट्टी लाकूड फाटे शेती उपयोगी अवजारे ठिबक सिंचनचे पाईप असेच जळून खाक झाले याची अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.[ads id="ads2"]
आग लागता क्षणी लगतच असलेल्या विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक पंप च्या साह्याने आग विझवण्यात आली तर यावल येथील नगरपालिकेचा अग्निशामक पंप बोलवून ती विझवण्यात आली गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले बाजूस त्यांची गाई म्हशी बांधलेली होती रोहिण्याचे वारे सुरू असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरतही होती मात्र तिला गावकऱ्यांनी आळा घातला.


