सातपुड्यात अतिक्रमण धारकांना पंचवीस ते एक लाख रुपयात जमिनीचा ताबा.
कोट्यावधी रुपयाची कमाई कोण करीत आहे..?
यावल (सुरेश पाटील) रावेर, यावल, चोपडा तालुका किनारपट्टीवरील सातपुडा जंगलात बेसुमार वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु आता गेल्या पाच दहा वर्षाच्या कालावधीत मध्य प्रदेशातील ठराविकच आदिवासी बांधवांना महाराष्ट्र राज्यातील सातपुडा जंगलात जागा उपलब्ध करण्यासाठी म्हणजे अतिक्रमण करण्यासाठी प्रत्येकी 25 हजारापासून एक लाख रुपये पर्यंत रक्कम घेऊन हजारो हेक्टर वन जमिनीवर मध्यप्रदेशातील आदिवासींनी अतिक्रमण करून वन जमीन ताब्यात घेतल्याच्या अनेक घटना सातपुड्यात घडल्या आहेत तसेच महाराष्ट्रातील आदिवासी तडवी लोकांनी अतिक्रमण करू नये म्हणून तसेच त्यांच्याकडून जमिनी ताब्यात देण्याबाबत रकमा घेतल्यास जास्त चर्चा होईल म्हणून मोठी दक्षता पाळली पाळल्याने बऱ्याच आदिवासी तडवी बांधवांना अतिक्रमण करता आलेले नाही त्यामुळे सातपुडा जंगलात यावल पूर्व भागातील आदिवासी तडवी बांधवांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
मध्य प्रदेशात ज्या आदिवासी बांधवांच्या नावावर शेती इत्यादी मालमत्ता प्रॉपर्टी आहे त्यांना यावल रावेर तालुक्यात तथा महाराष्ट्रातील सातपुडा जंगलात अतिक्रमण करण्याच्या आधी व नंतर (आदिवासी तडवी बांधवांना वगळून) आधार कार्ड रेशन कार्ड कोणत्या नियमानुसार दिले जाते हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात असून मतदानाच्या दृष्टिकोनातून याबाबत लोकप्रतिनिधी सुद्धा गप्प बसतात हे दुर्भाग्य म्हणावे लागेल.[ads id="ads2"]
सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तथा महाराष्ट्रातून चोपडा तालुका परिसरातून सागवानी लाकडाचे भरलेले कंटेनर यावल पूर्व वन विभागातून यावल, फैजपूर, सावदा, रावेर मार्गे मध्य प्रदेशात ठराविक दिवशी आणि वेळी बिनधास्तपणे रवाना होत असतात याकडे यावल पूर्व भागातील फॉरेस्ट तपासणी नाक्यावर तपासणी कोणत्या प्रकारे केली जाते याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या गंभीर प्रकाराकडे यावल वनविभाग जळगाव सहाय्यक वन संरक्षक उपवन संरक्षक यांनी आपले लक्ष केंद्रित करून प्रतिबंध करावा अशी मागणी चोपडा,यावल,रावेर तालुक्यातून होत आहे.


