रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सावदा येथून जवळच असलेल्या वाघोदा खुर्द ता.रावेर गावालगत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सावदा पोलीसांनी (Savada Police) धाड टाकून कारवाई केली यात ११ जणांना अटक करून त्याच्या जवळून ३५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्यावर सावदा पोलिस स्टेशनला (Savada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे कडून ३५ हजार ७०० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.[ads id="ads1"]
मिळालेली अधिक सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यात लहान वाघोदा गावाजवळ असलेल्या मस्कावद रोड वर झाडाजवळ अवैधरित्या जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती सावदा पोलीसांना(Savada Police) yanaa मिळाली. सावदा पोलीसांनी शनिवारी २७ मे रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास जुगार अड्डयावर छापा टाकून नामे [ads id="ads2"] धनराज राजेंद्र पाटील, अनवर उर्फ फिराज सरवर पटेल, साबीर सिकंदर पटेल, विनोद काशिनाथ कोळी, सुभाष मुरलीधर पाटील, अरविंद उर्फ दिपक रमेश पाटील, सुभाष धोंडू चौधरी, शाहरूख सिकंदर पटेल, उमेश पंडीत कोळी, अनिल रसुल पटेल, सर्व रा. वाघोदा ता. रावेर, काशिनाथ कोरोशिया रा. मेहतर कॉलनी, सावदा ता. रावेर या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती
त्यांचे कडून जुगाराचे साहित्य व रोकड मिळून एकुण ३५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त सुद्धा करण्यात आला आहे. सावदा पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.



