विशेष लेख : डिप्रेशन ........

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


  डिप्रेशन विषयी आपणाला काही माहित. नसतं तर डिप्रेशन काय असतं? याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊ. दैनंदिन जीवनामध्ये माझ्याकडे आलेल्या रुग्णाच्या अभ्यासावरून मी खालील गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे लक्षने कोणकोणते असतात ? त्यामध्ये काय काय होतं हे सविस्तर बघू काही. लोकांचा जीवनातील रस हा दिवसेंदिवस कमी होत जातो .काही लोक तर मानसशास्त्रज्ञ त्यांना अशा प्रकारच्या तुम्हाला समस्या आहेत  .सांगतात पण या प्रकारच्या समस्या ह्या मला नाही येत असे ते स्पष्टपणे सांगतात का तर? याच्या मागे त्यांचा ईगो आड येत असतो. तर या [ads id="ads1"] 

1.अशा प्रश्नाकडे जर आपण लक्ष दिलं नाही, ढुसपणामुळे किंवा तेढेपणामुळे आपण त्याला ढकलत गेलो. तर याचं रूपांतर एखाद्या मोठ्या समस्येमध्ये होऊ शकत.

दुखी वाटणे किंवा कशातच रस न उरणे हे खरंतर नैराश्याची मुख्य आणि स्पष्टपणे जाणवणारी लक्षणे आहेत. यात बहुतांशी रुग्णांना सुरुवातीला पूर्वी रस वाटणाऱ्या गोष्टींमध्ये आता रस वाटत नाही. , आवडी आणि छंदही निरस वाटायला लागतात. याच्याच पुढची पायरी म्हणजे अशा लोकांना नंतर तर आपल्या मुख्य गरजा .,असलेलं स्वादिष्ट जेवण खाणं आणि आपल्या  जोडीदारासोबत वेळ घालवणे , काम क्रीडा करणे अशा गोष्टीतही रस वाटेनासा होतो. मग ही लोकं फक्त जगायचं म्हणून अन्न खातात. " मरत नाहीत म्हणून जगत असतात". कधी कधी चक्क अन्न चीवडत बसतात. जोडीदारासोबत वेळ घालवणे , काम क्रीडा करणे या गोष्टी त्यांना चक्क ओझं वाटायला लागतात. अशा सगळ्या प्रिय व्यक्ती बद्दल नंतर प्रेम किंवा जिव्हाळा वाटण कमी व्हायला लागतं , सण समारंभ साजरे, करणे कुटुंबात सगळ्यांना भेटणे, मित्र मैत्रिणींना एकत्र बोलावून मजा करणे, यापूर्वी असलेला रस हळूहळू कमी व्हायला लागतो. भविष्याबद्दल आशा न वाटणे , पुढच्या सुट्टीत आपल्याला कुठे फिरायला जायचं आहे? नवीन घर घ्यायचं आहे त्यासाठी काय योजना आखायच्या आहेत? अशा भविष्यातल्या योजना आखण्याच्या गोष्टीमध्ये मग हे लोक उदासीन व्हायला लागतात . काही रूग्ण मध्ये नैराश्याची सुरुवात झाल्यानंतर छंद जोपासना, मैदानी खेळ,  गप्पा मारणे अशा आनंददायक गोष्टी मधला रस कमी होतो. नाहीसा व्हायला लागतो. नंतर त्यांना कशातच रस वाटेना असा होतो. अशा व्यक्ती नंतर इतरांच्या बाबतीतही निरुत्साही,  बेपरवा व्हायला लागतात. नैराश्य आलेल्या व्यक्ती अनेकदा काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये पूर्ववत झाल्यासारख्या वाटतात. कारण त्यांनाही या भावना नको असतात. पण उत्साह वाटणाऱ्या घटनाानंतर ते पुन्हा हळूहळू आपल्या कोशात जायला लागतात. मग त्यांना कायमच कोणीतरी प्रोत्साहन देन, सतत कौतुक करणं, सतत कोणीतरी सोबत राहून दिनक्रम, आज मदत करणार अशी गरज निर्माण होते, सतत अशा प्रकारची मदत मिळवणं. खरंतर अवघड असतं. पण मग अशी मदत मिळणं बंद झालं की मग नैराश्य आलेल्या व्यक्ती पूर्वीपेक्षाही अधिक खोल गर्तेत जाण्याची शक्यता अधिक असते . अशा व्यक्तीची मनस्थितीची परिमितीनंतर सगळ्या जगाकडेच पाहण्याचा दृष्टिकोन निरस आणि नकारात्मक होण्यात होतो. नंतर सगळ्या जगाबद्दलच राग येणार, चिंता वाटणं सुरू होतं. अशा व्यक्तींना विनाकारण चिडचिडया , उदास राहायला लागतात. नेहमीच्या परिस्थितीत कधी कधी एखाद्या घटनेबद्दल खूप वाईट चिंता वाटणं स्वभाविक आहे. त्याला नैराश्य असं म्हणत नाही .पण सर्वसामान्य परिस्थितीतही काही लोकांना विनाकारण सगळ्या गोष्टी त मधला रस निघून गेल्यासारखा वाटणं किंवा सगळ्याच गोष्टी निरस निरर्थक वाटायला लागणं ही खरोखरच धोक्याची घंटा आहे.[ads id="ads2"] 


2. निरुत्साही वाटण.


    नैराश्याच्या काही व्यक्ती मध्ये शक्ती न वाटणे .  अशी लक्षणे दिसायला लागतात. खरंतर अशा केस मध्ये रुग्णांमध्ये खरंच शक्ती नसते असं नाही. त्यांच्या नेहमीची सगळी काम करण्याची शक्ती असते. पण आपल्यात शक्ती नाही आपल्या अंगातला त्रान नष्ट झाला आहे. असं त्यांना फक्त वाटत असतं हा यातला कळीचा मुद्दा आहे योग्य त्या उपचारांनी हे रुग्ण बरे होतात. त्यांना नेहमीप्रमाणेच उत्साही वाटायला लागतं.


3. खाण्याच्या सवयीत बदल किंवा अतिखाने / कमी खाणे.


     काही महिला ह्या नवऱ्यासोबत कुरबुर झालं की, बिस्किटचा डब्बा समोर ठेवून टीव्हीवरचे पूर्ण चॅनल बदलत बदलत काही तासात जेव्हा बिस्कीटचे अनेक पुडे चॉकलेट फस्त केलेले असतात. तेव्हा त्यांना विलक्षण अपराधी वाटतं आणि वाईटही वाटतं. यामुळे त्यांना त्यांच्या शारीरिक तक्रारी सुद्धा भोगावे लागतात .यांना मानसिक समाधान सुद्धा लाभत नाही . मग यातूनच नवराचा जो स्वभाव आहे तो जुळवून घेणारा नसतो. असं यांना वाटतं यांच्यासाठी ज्या माहेराहून किवा गावातून आलेल्या असतात. ते शहर सुद्धा अनोळखी असतं कधी कधी यांची नोकरी सुद्धा अशा वागण्यामुळे सुटून जाते . अशा गोष्टीचा त्यांना मानसिक धक्का बसून मग नैराश्य आल्याच जाणवतं.


वेगवेगळे पदार्थ खाऊन पाहणं खरंतर सगळ्यांनाच आवडतं जवळपास सगळ्यात आजारामध्ये तोंडाची चव जाणं, भूक न लागण अशी लक्षणे दिसतात. इतर आजारामध्ये काही इतरही शारीरिक लक्षण असतात. आजार बरा झाला की चव भूक पुन्हा येतात .नैराश्याच्या बाबतीतही या गोष्टी लागू होतात. जसे की भूक न लागणे , काही खावस न वाटण, सारखं गोड (कार्बोहाइड्रेट्स युक्त) आणि तळलेलं खावस वाटणे हे दोन्हीही परस्पर विरुद्ध असणारे लक्षण नैराश्याच्या अनेक लक्षणा पैकी एक असू शकतात. या लक्षणा बरोबर भावनाचा असमतोल असेल तर मनोविकारतज्ञाला भेटणं आवश्यक असतं.


4.   झोपेच्या समस्या.


     काही लोकांना वय झाल्यानंतर दिवसभर मित्र नसतात. ते एकटे असतात, घरात बरेच लोक आज तर एकटेच असतात. घरात काय करावे हे कळत नाही. अशा विचारामुळे बऱ्याच जणांचा थरकाप उडतो. काही विद्यार्थ्यांना सुद्धा नवीन नवीन महाविद्यालयात जावसं वाटत नाही. मित्र मैत्रिणींना मित्र कसं बनावं हे कळत नाही ? लग्न समारंभात जाणार त्यांना नको असतं? याचा परिणाम मग त्यांच्या झोपेवर होत असतो. निसर्ग नियमानुसार आपणाला आठ तास झोपणं गरजेचं आहे .पण ही झोप सुद्धा काही काही लोकांना  येत नाही. अशांमध्ये या समस्येला ग्रसित लोक मग दिवस दिवसभर कधी कधी पडून राहतात. झोपून राहत नाही सगळ्या गोष्टीतला त्यांचा रस कमी व्हायला लागतो.मग हे लोक काही वेळी आणि पाहिजे त्यापेक्षा जास्त झोपायला लागतात. कधी कधी त्यांना सुट्टी आहे. म्हणून तर कधीकधी लेक्चरला दांडी मारून ती चक्क दिवसेंदिवस झोपायला लागतात. कधी कधी तर त्यांना शाळेत गेल्यानंतर सुद्धा झोप यायला लागते .या झोपेचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि तब्येतीवर पडायला सुरुवात होते. जास्त झोपतात यांना घरचे लोक सुद्धा रागवायला लागतात. कधी कधी यांना शिक्षा सुद्धा केली जाते. हे एवढं करून सुद्धा पुढच्या दिवसापासून यांची जी काही आदत असते, त्यास अदतीमध्ये हे लोक आपला दिनक्रम चालू करतात. मग यांचं कशात लक्ष लागत नाही ,कशात रस वाटत नाही, सतत झोपून राहावंसं वाटतं आणि जेव्हा या प्रकारचे पेशंट हे माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना नैराश्य आलेलं असतं हे दिसून येतं.

   वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेलं तर प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रमाणात झोपेची आवश्यकता असते. प्रत्येकाचा झोपेचा ठराविक पॅटर्न असतो. नैराश्यामध्ये काही रुग्णांना निद्रानाश म्हणजेच ( इन्सोमीनिया) होतो काही जणांची झोप अनियमित होते. काहींना थोड्या थोड्या वेळाने जाग येते. अस्वस्थ वाटत राहतं तर काहीजणांना सात ते आठ तास झोप झाली तरी दिवसभर झोप येत राहते. ते अनेकदा काम किंवा अभ्यास सोडून झोपतात काही रुग्णांच्या बाबतीत त्यांच्या झोपेच्या वेळा आणि झोपेचं पॅटर्न अचानक बदलतं.


5. नैराश्या मध्ये इतर शारीरिक लक्षणे.


    यामध्ये छातीचे ठोके खूप वाढायला लागतात, डोकं दुखायला लागतं ,गुदमरल्यासारखं वाटतं , खूप घाम येतो, श्वास थांबल्यासारखा वाटतो, बरं वाटत नाही आणि ज्या कामांमध्ये आहोत किंवा जी काम आपण दररोज करतो. त्या ठिकाणाहून आलं की आपणाला काहीच झालेलं नाही असं वाटायला लागतं. असे लोक वारंवार नेहमी दवाखान्यांमध्ये जाऊन त्यांना नेहमी चेक करत असतात. पण त्यांचे रिपोर्ट चे नेहमी सामान्य येत असतात. अशी लक्षणे जाणवणं म्हणजे शारीरिक नसून ती मानसिक असतात. हे त्यांना माहीत नसतं यामध्ये काही जणांना टाळाटाळ करण्याची आस सुद्धा असते. यामुळे विनाकारण ते चिंता करत असतात. अस्वस्थ वाटतं यातून त्यांचे पाठ दुखायला सुद्धा लागते,  ती पाठ दुखी ही कधी होते. तर ज्यावेळेस हे जे कोणते काम करत असतील त्यावेळेस ते पाठ दुखायला जास्तच लागते. मग हे लोक कार्यालयात जाण्यासाठी दांडी मारायला सुरुवात करतात. काही सेवानिवृत्त झालेले लोक त्यांना वेळ खायला उठतो. मग ते काहीही खात बसतात. त्यांचा वेळ जात नसल्याकारणांना त्यांना झोप पण नीट येत नाही. शारीरिक मेहनत नसल्याकारणात मुळे त्यांना झोप सुद्धा लागत नाही. यामुळे या लोकांचा दिवस सुद्धा आळसा जातो. आणि हे उदास राहण्यात मग्न राहतात.

    पाठ दुखी , पोटदुखी , हृदयाची अनियमित स्पंदना आणि वजन कमी होणं .ही खरंतर वेगवेगळे शारीरिक आजाराची लक्षणे आहे. त्यावर योग्य ते उपचार केले की ही लक्षणा नाहीशी होतात. पण हीच लक्षणा जेव्हा मानसिक आजाराची असतात. तेव्हा ती निदान चाचणीमध्ये कोणतीही शारीरिक व्याधी दाखवत नाहीत  त्यांच्यावर औषधोपचाराचा या लक्षणावर म्हणावा तसा फायदा होत नाही. यामुळे नैराश्य असणारे व्यक्ती तर त्रास होऊन जातेच. पण तिच्या घरच्यांना आणि आजूबाजूच्या व्यक्तींनाही ती व्यक्ती आपल्याला त्रास होतो. असं उगाचच नाटक करते किंवा खोटं बोलते की काय असा संशय यायला लागतो . अशावेळी योग्य निदान झालं नाही तर त्या व्यक्तीची परिस्थिती केविलवाणी होते आणि हे व्यक्ती परेशान होतात. की नेमकं करावं काय हे सुचत नाही.


6. नैराश्यामध्ये काम इच्छा कमी होणे. 


    आज काम इच्छा कमी होणे, याचा खूप मोठा परिणाम आपल्या कुटुंबावर आणि स्वतःवर होत असताना दिसून येतो. समाजामध्ये या प्रकारचे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही लोक दिसून येतात. या प्रकारच्या गोष्टी इतरांना दाखवता सुद्धा येत नाहीत. तर ह्या पण मानसिकतेशी निगडित असतात .यात काही शंका नाही नैराश्यामध्ये बहुतांश वेळा आपल्याला नेहमी आवडीच्या असलेल्या कामामधला आणि छंदा मधला रस निघून जातो. त्याचप्रमाणे मग कामेच्या ही कमी होते. अशावेळी स्त्रियांना समाधान करताना योनीमध्ये वेदना होतात. कोरडेपणा जाणवायला लागतो .अशी लक्षणे दिसू शकतात. तर पुरुषांमध्ये अकाली वीर्य स्खलन होणं अशी लक्षण दिसू शकतात. या लक्षणांमुळे पुन्हा काम क्रीडा करण्यात आली आत्मविश्वास कमी होतो , आणखी नैराश्यात अशा प्रकारची दुष्टचक्र त्या व्यक्तीच्या जीवनात यायला सुरुवात होते .जर या प्रकारच्या व्यक्तीला मला नैराश्य आहे हे समजलं तर याच्यावर इलाज उपचार होऊ शकतात.


7. नैराश्यामध्ये अस्वस्थपणा.


अस्वस्थ होणार किंवा मंद होणार अशी लक्षणे दिसू शकतात. याला हायपर ऍक्टिव्हनेस किंवा स्लो डाउन असं पण काहीजण म्हणतात काही लोक अचानक शांत होतात. तर काही लोक अचानक हे बडबडे होतात. अशा लोकांच्या एकंदरीतच काम करण्याच्या वेगामध्ये सुस्तपणा तरी येतो. किंवा उगाचच घाई झाल्यासारखे गडबड तरी होते .दोन्ही परस्परविरोधी लक्षणे नैराश्याची असतात.


8.  नैराश्या मध्ये अपराधीपणा वाटायला लागणे.


या प्रकारच्या वागण्याला या व्यक्ती स्वतःबद्दल यांच्यामध्ये आत्मविश्वास नसतो.आपण भूतकाळात जर काही चुका केल्या असतील. तर त्याबद्दल आता मनात अपराधीपणा येऊन वर्तमान काळात जगणं सोडलं तर आयुष्य वाईट होऊ शकतं .असं यांना वाटायला लागतं आपण सगळेच काही सगळे सद्गुन घेऊन जन्माला येत नाही. आपण काही खूप असामान्य नाही बुद्धिमान नाही., आपल्याला जन्मजात कोणतीतरी कला अवगत नाही, आपण प्रचंड श्रीमंत नाही, याची जवळपास या लोकांना कल्पना असते. सगळ्यांनीच ही परिस्थिती स्वीकारलेली असते .तर हे सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळणं स्वतःचं आणि कुटुंबाचं पोटभरेल इतकी मिळकत असणार. आणि काही पायाभूत सोयी सुविधा मिळवणार हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण काही कारणांनी असं होत नाही. अनेकदा भूतकाळातल्या घटनांनी माणसाच्या मनावर अशी काही जखम होते की, तिचा उरण आयुष्यभर राहतो तेव्हा मात्र अनेकांना न्यूनगंड यायला लागतो. मनात अपराधीपणाची आणि स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण व्हायला लागते .त्यातून आजच्या सोशल मीडियाच्या जगात अमुक एक व्हिडिओ मारला की तुम्ही स्पेशल व्हाल, तमुक प्रकारची पुस्तकं वाचली की फार फाड फाड इंग्रजी बोलायला लागेल., आणखी कोणत्यातरी कोचिंग क्लासला गेला तर तुमची मेडिकलची किंवा इंजिनियरचे सीट पक्की अशा प्रकारच्या जाहिरातीचा  प्रचार चालू असतो. त्यामुळे सर्वसामान्य माणूस वास्तव ते पासून दूर जाऊन स्वतः बद्दलच्या अपेक्षा वाढवून ठेवतो. त्या पूर्ण झाल्या नाही की नैराश्याच्या गर्तेत  जायला लागतो. त्यातून पुढे आपण जगत राहण्यापेक्षा मरून गेलेलं बरं .असं अनेकदा वाटायला लागतं. अशी माणसं मग जेव्हा आपल्याला किती वाईट वाटतं असंत इतरा ंना पुन्हा पुन्हा सांगतात. तेव्हा इतरांना ते भोंग करतात की काय असं वाटायला लागतं त्यामुळे मग नैराशान ग्रासलेल्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळण आणखी कठीण होऊन बसतं.


9. नैराश्यामध्ये लक्ष केंद्रित करता न येणे.


आजच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना लक्ष केंद्रित करतो येत नाही .यामध्ये लहानापासून तर अगदी म्हाताऱ्यापर्यंत ही समस्या आज आपणाला दिसून येते .या समस्येमुळे बऱ्याच लोकांचा गोंधळ उडाल्यासारखा होतो .दोन-तीन जरी काम असली तरी कोणतं काम करावं काय करावं हे सुचत नाही. आपल्या क्षमतेपेक्षा आपल्यावर जास्त काम टाकली असं वाटायला लागतं .यातून यांचा आत्मविश्वास कमी होतो. भांबावून गेल्यासारखं वाटतं या प्रकारच्या गोष्टी नैराश्यात असलेले लोक कबूल करतात.

गोंधळ उडणं आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना यांनाही लक्षणे सामान्यपणे तत्कालीन कारणाने दिसू शकतात. पण असं सारखंच व्हायला लागलं किंवा वाढायला लागलं आणि त्याबरोबर आणखीही काही लक्षण असते तर, ही नैराश्याची सुरुवात असण्याची शक्यता असते. असं म्हणायला हरकत नाही .अशा लोकांमध्ये सुरुवातीला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना. येणार विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपल्या आवडीच्या वाटणाऱ्या आणि पूर्वी सोप्या वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास आता कठीण वाटण अनेकदा वाचलं तरी लक्षात राहत नाही ना अशी लक्षणे दिसतात. नैराश्य असणाऱ्या लोकांना आपली स्मरणशक्ती आणि मेंदूची काम करण्याची क्षमता कमी झाली आहे. असं वाटायला लागतं अशा लोकांना अनेक साधे साधे निर्णय घेता येत नाही. त्याची कायमची विधान मनस्थिती असते. कॉलेजमध्ये कोणते कोणते विषय घ्यावे ? दुसरी नोकरी मिळत असतानाही नोकरी सोडावी की सोडू नये किंवा बाहेर फिरायला जाताना कोणता ड्रेस घालावा ? हॉटेलमध्ये गेलं की कोणता पदार्थ निवडावा ? काही खरेदी करताना अनेक वस्तू मधून आपल्या गरजेची आणि आपल्याला परवडेल अशी योग्य वस्तू निवडणे या लोकांना अवघड जात.


10. नैराश्यात नाती टिकवता न येण.


आजच्या घडीला मानव समाज आणि प्रत्येक व्यक्ती हा एकटा पडत चाललेला आहे. यामधून एक नाहीतर अनेक समस्या ह्या बाहेर येत आहे .अगोदर अशा प्रकारच्या समस्या नव्हत्या आणि असतील तरी त्याचे प्रमाण मात्र खूप कमी होते. ज्या लोकांमध्ये नैराश्याची भावना किंवा हा आजार त्यांना होतो. त्या प्रकारची मी बघितलेली काही माणसे हे अचानक नातेसंबंध तोडतात. अलिप्तपणे राहण्याचा प्रयत्न करतात., एकलकोंडे राहतात ,आपल्याच कोशात जाणं किंवा एखाद्या व्यक्तीकडून अवाजवी अपेक्षा ठेवणं ,अशी लक्षणे या व्यक्तीमध्ये जास्त दिसतात .काही वेळा ही लक्षणं वेळीच समजतात आणि निदान आणि उपचार करता येतात. तर काही वेळा ही लक्षणे कळत नाहीत. नंतर ती एखाद्या घटनेतून समोर येतात. पण ही लक्षणा दाखवणारे व्यक्तीवर चिडचिड न करता तिच्यावर न रागावता तिला समजून घेतलं मी योग्य ते उपचार दिले तर अशा व्यक्ती लवकरच पुन्हा समाजात मिसळायला लागतात.


11. नैराश्यामध्ये व्यसन किंवा दारू पिण्याचे प्रमाण वाढणे.



  तसे दारू पिणे हा आजार जास्तीत जास्त तरुणांमध्ये दिसून येतो .अगोदर दारू ही एक मस्करी, टिंगल, टवाळी म्हणून घेतली जाते .कोणी तरी आपलं रोल मॉडेल या प्रकारचं वर्तन करत असते .म्हणून आपण या प्रकारचं वर्तन करीत असतो. सुरुवातीला पार्ट्यांमध्ये मित्रांमध्ये दारू किंवा इतर नशा ह्या मित्रासोबत केल्या जातात. मग हळूहळू याचं प्रमाण वाढलं की लोक एकट्या मध्ये सुद्धा घ्यायला लागतात.

कधीतरी थोड्या प्रमाणात दारू पिणार मोज माझ्यासाठी दारू पिऊन पहाने, एकाकी वाटल्यामुळे किंवा अपयशांना खचून गेल्यामुळे दारूचा व्यसन लागणार .या दोन महत्त्वपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. पण हल्ली दारू सोबत आमली पदार्थाचे सेवनही वाढलं आहे. अमली पदार्थाचे सेवन करण हे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे. कायद्याने गुन्हा आहे तरी हे प्रमाण खूप प्रचंड वाढलेलं आहे. आता फक्त मुलंच नाही तर शहरी भागातील मुली सुद्धा दारू पीत आहेत. सुरुवातीला मजा म्हणून आणि नंतर गरज म्हणून दारू आणि सिगारेटच्या व्यसनांना हे बळी पडत चालले आहेत. हे आज आपणाला चौका चौकात दिसून येतं .आलेले लोक खरंतर या व्यसनाद्वारे आपल्या नैराश्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधत असतात .पण अशा व्यसनामुळे त्यांची नैराश्यातून सुटका तर होत नाहीत तर ते अजून गर्तेत जातात .अशा वेळी तारतम्यांचा विचार करून दारू सोडली पाहिजे आणि त्याबरोबर योग्य समुपदेशकाचा सल्ला घेऊन नैराश्यातून बाहेर पडायला पाहिजे.

12. कामातील कौशल्य हरपणे..


जिवलग माणसाचा मृत्यू होणे, विरह होणे, नोकरी जाणे, लग्न मोडणे, अशा दुःखद घटनांमुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. परंतु त्यातून बाहेर येऊन नेहमीच जीवन जगणं तितकं महत्त्वाचं असतं .काही लोकांना हे जमत नाही आणि ते आपल्या कामात लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे त्यांचं कामातलं कौशल्य कमी होत जातं आणि माणूस नैराश्याच्या गर्तेत फसत जातो .हेच बघा ना की कोणताही लोहार हा कोणत्याही प्रकारची शारीरिक कसरत करत नाही. पण त्याचे बाहु हे खूप कसलेले व आकर्षित असतात .याच प्रकारे एखादा अकाउंटंट असतो तो गणितामध्ये किंवा हिशोबामध्ये कधीच चुकत नाही का तर त्याचा तो सराव असतो.


13 . चटकन राग येणार आणि बारीक सारीक गोष्टीवरून चिडचिड करणे.


नैराश्यात काही लोकांची लहान कारणांनी ही चिडचिड होते. त्यांना राग यायचं प्रमाण वाढतं इतरांना सामान्य वाटणाऱ्या गोष्टींनाही अशा लोकांना चटकन राग येतो.ते भांडण करायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं, घरात वावरणार, आणि कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणे अवघड होत जातं .या व्यक्ती कायमचं कशावर तरी संतापलेल्या असतात .त्यामुळे त्यांच्याशी कोणी काहीही बोलायला गेलं की त्याचं व्यक्तीवर चिडतात. त्यामुळे नातेसंबंध बिघडतात .यातून चिडचिडेपणा ,आक्रमताळेपणा, राग राग होत असलेल्या व्यक्तींना तुझं काहीतरी चुकतंय तुला मानसिक मदतीची आवश्यकता आहे .असं कोणी सांगण्याचा जरी प्रयत्न केला तर त्या अनेकदा ऐकत नाहीत .समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञ यांच्याकडे जायला ते नकार देतात आणि मग परिस्थिती अजूनच बिकट होत जाते.


14.  भविष्य निराशा जनक वाटणे .आत्महत्येचे विचार मनात येणे आणि प्रत्यक्ष आत्महत्येसाठी प्रयत्न करणे.


   नैराश्या मध्ये कोणत्याच गोष्टीत काही अर्थ नाही .  ,असं वाटत राहतं, आणि जगण्याचं प्रयोजनच कळत नाही .काही व्यक्तींना आयुष्याचा रस्ता सापडत नाही .अशा परिस्थितीमध्ये मग तीव्र नैराश्य येतं त्याच वेळी नैराश्यग्रस्त व्यक्ती आपलं जीवन संपवून टाकायचा आणि आत्महत्या करायचा विचार करतात .आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्ती पैकी बहुतांश व्यक्तींनी नैराश्य आलेलं असतं.


15. नैराश्यात दुःख 


      आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहामुळे किंवा मृत्यूमुळे काही वेळा अति व दुःख होऊन ते नैराश्याचं कारण होऊ शकतं . ती व्यक्ती आता आपल्या सोबत नाही ही गोष्टच त्यांना कल्पनातीत वाटायला लागते.त्या व्यक्तीशिवाय आपल्याला आयुष्य पुढे जगाव लागेल. हे त्यांच्या पदरीच पडत नाही त्यामुळे त्यांना कशातच रस वाटत नाही. अन गोड लागत नाही ,सारखं रडू येतो, यामुळे अशा व्यक्ती आपलं स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतात. मी बघितलेल्या काही केस मध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचा अचानक झालेला विरह किंवा मृत्यू यासारखे दुःख सहन न करता आल्यामुळे नैराश्याची सुरुवात ही होऊ शकते.


   सदर समस्येसाठी माझ्याकडे नेहमी हे रुग्ण येत असतात त्या रुग्णाकडून मी या गोष्टीचा निरीक्षण केलेलं आहे आणि त्यातून अशा गोष्टी मांडण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारचं आपणाला कोणत्याही प्रकारचं लक्षण वाटत असेल तर आपण कोणत्याही मानसशास्त्रज्ञाचा समुपदेशकाचा सल्ला घ्यायला पाहिजे ना की याला चाल ढकलपणा किंवा होईल नीट असं करायला नाही पाहिजे.

                                    प्रमोद पडघान (मानसशास्त्रज्ञ )

                                          संपर्क 90 75 977 239

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!