प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका तर्फे पंचायत समिती येथे लाक्षणिक उपोषण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (विनोद हरी कोळी) प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चु भाऊ यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष माननीय सुरेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत आज दिनांक 2 /5/ 2023 या रोजी पंचायत समिती रावेर येथे प्रहार दिव्यांग संघटना रावेर यांनी लक्षणीय उपोषण केले.[ads id="ads1"] 

    रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधव यांना अधिनियम 2016 च्या शासन जीआर नुसार संबंधित ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्व उत्पन्न मधून 5% निधी दिला जातो तसेच दिव्यांग बांधव यांना 50 टक्के घरपट्टी माफी दिली जाते असा शासनाचा जीआर आहे परंतु रावेर तालुक्यातील 2016 च्या शासन जीआर नुसार संबंधित ग्रामसेवकांनी दिव्यांग बांधव यांना लाभ दिला नाही.त्याबद्दल अनिल भाऊ चौधरी यांनी उपोषणा ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून चांगला चोप दिला.[ads id="ads2"] 

   यावेळी प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश दादा पाटील यांनी पंचायत समिती मधील संबंधित अधिकारी यांना ठणकावून सांगितले.

   तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी बोलले की दिव्यांग बांधवांच्या मागण्या एक महिन्याच्या आत पूर्ण झाल्या नाही तर आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे साखळी उपोषण करू तरी पण आमचा विचार जर का केला नाही तर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे आमरण उपोषणाचा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष विनोद कोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. त्यावेळी विस्तार अधिकारी शिंदे साहेब यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांना अहवाल प्रस्ताव सादर केला आणि आम्ही एक महिन्याच्या आत रावेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव यांना त्यांच्या हक्काचे पाच टक्के निधी आणि 50 टक्के घरपट्टी माफ करा असे रावेर तालुक्यातील सर्व ग्राम सेवकांना लेखी पत्र व्यवहार करू अशा आश्वासन यावेळी विस्तार अधिकारी शिंदे साहेब यांनी सर्व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रावेर तालुका यांना देऊन उपोषण सोडविले.

    त्या ठिकाणी उपस्थित प्रहार जनशक्ती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय" अनिल भाऊ चौधरी ,शेतकरी जिल्हा आघाडी अध्यक्ष सुरेश दादा पाटील प्रहार दिव्यांग उपजिल्हाध्यक्ष दिनेश सैमिरे, प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष विनोद कोळी, प्रहार दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील तालुका सचिव भागवत शेलोळे, फिरोज तडवी, दिव्यांग संपर्कप्रमुख शेख मोहसीन ,प्रहार अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख वसीम  शाखा अध्यक्ष गोपाल कोळी शाखाध्यक्ष प्रमोद महाजन शाखाध्यक्ष  सुधीर पाटील ,दिव्यांग, तालुका संघटक विश्वनाथ भिल्ल, भाजपा दिव्यांग तालुकाध्यक्ष रजनीकांत बारी, भाजपा दिव्यांग जनकल्याण अध्यक्ष संजय बुवा, समाधान कोळी, लतिका कोळी, बबीता तडवी, दशरथ अडागळे ,मोहम्मद पिंजारी, ईश्वर सोनार ,इत्यादी दिव्यांग बांधव उपोषणा ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!