40 वर्षीय महिलेचा खून ; आरोपीला अटक : यावल तालुक्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



फैजपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
विवाहित पुरूषासोबत राहण्याचा हट्ट केल्याने 40 वर्षीय महिलेच्या गळ्यावर ब्लेड मारून व तिला विहिरीत ढकलण्यात आल्याने महिलेचा मृत्यू झाला. [ads id="ads1"] 

  या प्रकरणी फैजपूर पोलिसात (Faijpur Police Station)  संशयित खुमसिंग सरदार बारेला वय 33 वर्ष मूळ राहणार खिरवड, ता. रावेर, ह.मु.मोर धरणाजवळ, हिंगोणा, ता.यावल या संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलिसांनी अटक केली आली.[ads id="ads2"] 

अखेर आरोपीची ओळख पटली

मिळालेल्या  माहितीनुसार, 40 वर्षीय महिला ही संशयीताकडे घरी आली व त्यावेळी महिलेने त्याच्या घरी राहण्याचा हट्ट केला. त्यावर तु तुझ्या घरी निघून जा, तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल, असे त्याने तिला म्हटले होते मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने संशयिताने त्याच्याकडे असलेल्या धारदार ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले व नंतर तिला विहिरीत ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. सदर घटनेचा  तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ हे करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!