फैजपूर ता.यावल प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
येथील सर्वत्र तापमानामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना येथील वाहतूक पोलीस कर्मचारी सलीम तडवी हे गेल्या दोन वर्षा पासून वाहतूक पोलिसांची सतत सेवा करीत आहे.[ads id="ads1"]
गेल्या दोन वर्षापासून वाहतूक पोलीस सलीम तडवी कर्मचारी तसेच बाळू भोई हे वाहतूक पोलिसांची जबाबदारी पार पाडत मात्र गेल्या दोन महिन्या पूर्वी वाहतूक पोलीस कर्मचारी बाळू भोई यांची न्हावी ओपी येथे नेमणूक झाल्यामुळे सलीम तडवी यांच्यावर मोठी जबाबदारी वाढली असल्याचे दिसत आहे.[ads id="ads2"]
त्यांच्या सोबतीला होमगार्डचे कनिष्ठ अधिकारी सुनील क्षत्रिय हे सुद्धा भर उन्हात सहकार्य करीत असल्याचे दिसत असून फैजपूर हे शहर हे यावल रावेर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून येथून दररोज हजारो वाहने ब्रहानपूर अंकलेश्वर हायवे असल्यामुळे वाहतात सध्या लग्नसराई मुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असून आणि मोठ्या प्रमाणावर वाढत असलेला तापमान अशा परिस्थितीत वाहतूक पोलीस कर्मचारी सलीम तडवी हे आपले कर्तव्य निस्वार्थपणे फैजपुर विभागाचे डी वाय एस पी कुणाल सोनवणे तसेच एपीआय निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसाची जबाबदारी बजावत असल्याचे दिसत आहे.